अर्जुनीमोर बाजार समितीच्या मुख्य प्रशासक पदी लोकपाल गहाणे यांची नियुक्ती - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, फेब्रुवारी ०६, २०२१

अर्जुनीमोर बाजार समितीच्या मुख्य प्रशासक पदी लोकपाल गहाणे यांची नियुक्ती

अर्जुनीमोर बाजार समितीच्या मुख्य प्रशासक पदी लोकपाल गहाणे यांची नियुक्ती             


 अन्य तिघांची अशासकीय प्रशासक म्हणून नियुक्ती.
संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.6 फेब्रुवारी:-
अर्जुनीमोर-मोर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आशासकीय प्रशासक मंडळात मुख्य प्रशासक म्हणून शिरेगाव बांध येथील लोकपाल दुधराम गहाणे यांची मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर अशासकीय प्रशासक म्हणून बोळदे येथील बंसिधर रामकृष्ण लंजे ,मोरगाव येथील गिरीश देविदान पालीवाल तर इटखेडा येतील उद्धव सिताराम मेहंदळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र शासन कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांचे 4 फेब्रुवारी 2021 चे पत्रानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. अर्जुनी-मोर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत 2 सप्टेंबर 2020 ला संपुष्टात आली होती. चार सप्टेंबरला सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी प्रशांत गाडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली होती .सहकार क्षेत्रात सखोल अभ्यासक समजले जाणारे प्रशांत गाडे यांनी पाच महिने कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक म्हणून उत्तम रित्या कार्यभार सांभाळला होता. आता नुकतीच तालुक्यातील चार लोकांची अशासकीय प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे. यामध्ये मुख्य प्रशासक म्हणून लोकपाल गहाणे (राष्ट्रवादी काँग्रेस )तर प्रशासक म्हणून बंसिधर लंजे (काँग्रेस )गिरीश पालीवाल (काँग्रेस )उद्धव मेहंदळे (राष्ट्रवादी काँग्रेस )यांची नियुक्ती करण्यात आली., चारही प्रशासकांच्या नियुक्तीमुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.