गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकृतीसाठी कार्यकर्त्यांनी केले महायज्ञ - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०७ फेब्रुवारी २०२१

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकृतीसाठी कार्यकर्त्यांनी केले महायज्ञराष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सरस्वती मंदिरात साकडे

 तालुका प्रतिनिधी

काटोल : विधानसभा आमदार तथा राज्य चे गृहमंत्री ना अनिलबाबू देशमुख यांना करोनाची लागण झाली आहे.त्यापासून मुक्ती मिळावी याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे  पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आज रविवारला सकाळी सरस्वती मंदिरात मोठ्या संख्येत एकत्रित येऊन साकडे घालून होमहवन केले. त्याचे निरोगी आयुष्याची परमेश्वरानकडे प्रार्थना केली. अशी माहिती तालुका राष्ट्रवादीचे मुन्ना पटेल यांनी दिली.

ना अनिल बाबू देशमुख करोना योद्धांच

राज्याचे गृहमंत्री ना अनिल बाबू देशमुख यांनी आपल्या जीवाची पर्वा नकरता करोना महामारीचा विशेष काळात रात्रदिवस एक करून संपूर्ण राज्यात दौरे केले. पोलीस विभाग, जनता यांच्याशी संवाद ठेऊन जनजागृती व करोना कसा नियंत्रणात  राहील राज्यातील कायदा सुव्यवस्था यशस्वी जबाबदारीने पार पाडली. त्याकाळात गृहमंत्री ना देशमुख  यांना जनतेची बळ ,आशीर्वाद  दिले . आता त्यांना काहीच होणार नाही ते पुरवतात आपली जबाबदारी पार पडणार असल्याचे प्रतिक्रिया काटोल विधानसभा क्षेत्रातून येत असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हा पदाधिकारी नितीन ठवळे यांनी सांगितले.