शरद पवारांच्या आधीच केला पुतळ्याच्या अनावरणाचा प्रयत्न; पडळकरांवर गुन्हा दाखल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१२ फेब्रुवारी २०२१

शरद पवारांच्या आधीच केला पुतळ्याच्या अनावरणाचा प्रयत्न; पडळकरांवर गुन्हा दाखलपुणे : जेजुरी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्या या पुतळ्याचे अनावरणाचे नियोजन केले होते. पण त्यापुर्वीच पडळकर यांनी आज पहाटे या पुतळ्याच्या अनावरणाचा प्रयत्न केला आणि पवार यांच्यावर गंभीर आरोपही केले.

जेजुरी गडावर आज सकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पहाटे पडळकर आणि त्याचे काही कार्यकत्यांनी गडावर जाऊन पुतळ्याभोवती फुलांची सजावट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पडळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी पडळकर यांना पुतळ्याचे अनावरण करताना रोखले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत बाचाबाची देखील केली.

पडळकर यांनी यापुर्वीही असे प्रकार केले आहे.  शरद पवार याच्यांबाबात त्यांनी या आधीही असे आरोप लावल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे. बारामती विधानसभा मतदार संघातून निवडणूनक लढविताना पडळकर यांचे डिपॉझिट जप्त करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांने हे आरोप लावण्याचे प्रकार सुरु केले आहेत.