आदिवासी फ्रंटल सेल स्थापित करा : दिलीप पनकुले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

११ फेब्रुवारी २०२१

आदिवासी फ्रंटल सेल स्थापित करा : दिलीप पनकुलेराष्ट्रवादी पक्षातर्फे राष्ट्रीय व राज्य स्तरावर आदिवासी फ्रंटल सेल स्थापित करावे, अशी मागणी प्रदेश चिटणीस दिलीप पनकुले यांनी आज खासदार प्रफुल पटेल यांना निवेदन देऊन चर्चा केली. 

        याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (जलसंपदा मंत्री) यांना नागपूर संवाद दौऱ्यात पाचारण करण्यात आले होते. आदिवासी समाजाला न्याय मिळण्यासाठी तसेच हा समाज एकत्र करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढाकार घ्यावा असे निर्देशही पक्षाध्यक्ष मा. खासदार शरद पवार यांनी दिले होते हे विशेष ! 

        आदिवासी समाजाला ताकद व त्यांच्या समस्या सोडविण्याकरिता या समाजाला मुख्य प्रवाहात सामावून घेणे आवश्यक असल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी विजय मसराम, बबलू चव्हाण, संजय शेवाळे, सोपानराव शिरसाट, रवींद्र मुल्ला, प्रमोद रामेकर, विलास पोटफोडे, मच्छिंद्र आवळे, निर्मला कुमरे, पियुष पेंदाम, सदाशिव रागीट, राहूल येन्नावार, वर्षा कुंभलकर प्रामुख्याने उपस्थित होते.