चारचाकी वाहनाची डिव्हायडर ओलांडून वाहनाला धडक; फोटो बघूनच लक्षात येईल अपघाताची भीषणता - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, फेब्रुवारी १४, २०२१

चारचाकी वाहनाची डिव्हायडर ओलांडून वाहनाला धडक; फोटो बघूनच लक्षात येईल अपघाताची भीषणता


शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी):
नागपूर चंद्रपुर मुख्य मार्गावरील एनटीपीसी रेल्वे क्रॉसिंग जवळ समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनावर डिव्हायडर ओलांडून चारचाकी वाहनाने धडक दिल्याने या वाहनातील दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी दोन वाजता घडली.
यातील चंद्रकांत रामकृष्ण पोईनकर वय 48 व त्यांची पत्नी कुमोद चंद्रकांत पोईनकर वय 44 राहणार संताजी नगर भद्रावती हे दोघेही एम एच 34 एए 97 85 या चारचाकी वाहनाने चंद्रपूरकडे जात असताना एम एच 47 सी 48 42 हे वाहन भरधाव वेगाने येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडर ओलांडून त्याले समोरून येणाऱ्या वाहनाला धडक दिली त्या वाहनातील दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात घडविणारा वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला असून भद्रावती पोलिसांनी त्यांचावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहे.