मालवाहक वाहनाची दोन दुचाकीला धडक तीन जखमी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ फेब्रुवारी २०२१

मालवाहक वाहनाची दोन दुचाकीला धडक तीन जखमी


शिरीष उगे (प्रतिनिधी भद्रावती ): नागपूर- चंद्रपुर महामार्गावरील भद्रावती शहरातील बसस्थानका समोर मालवाहक पिकअप वाहनाने दुचाकी वाहनाला दिलेल्या धडकेत दोन जण जखमी तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि. 11 ला सायंकाळी 7 वाजता च्या दरम्यान घडली.
यातील दुचाकीस्वार पुरुषोत्तम कोमटी हा गंभीर जखमी असून. विजय बिबटे, ज्योती ढवस हे जखमी झाले आहे. चंद्रपूर मार्गे भद्रावती कडे येत असलेले एम एच 34 एबी 3931 या पिकअप वाहनाने समोरून येत असलेल्या एम एच 34 ए वाय 2379 व एम एच 34 एटी 0058 या दुचाकीला धडक
दिल्याने यातील तिघेजण जखमी झाले. हि घटना सायंकाळी ७ वाजता बसस्थानक परिसरा समोर घडली . दोघांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पुरुषोत्तम किमटी याला चंद्रपूर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सपोनि सुधीर वर्मा घटनास्थळी दाखल होऊन घटनेकचा पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.