माळशेज घाटात टेम्पो ट्रॅव्हलर'ला भीषण अपघात! सर्व प्रवासी जखमी ४ गंभीर! #accident #Tempo #Traveler - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ फेब्रुवारी २०२१

माळशेज घाटात टेम्पो ट्रॅव्हलर'ला भीषण अपघात! सर्व प्रवासी जखमी ४ गंभीर! #accident #Tempo #Traveler

माळशेज घाटात टेम्पो ट्रॅव्हलर'ला भीषण अपघात! सर्व प्रवासी जखमी ४ गंभीर!


जुन्नर दि.३१ आळेफाट्याकडून कल्याण'च्या दिशेने जात असलेल्या "टेम्पो ट्रॅव्हलर'ला "माळशेज घाटात एका वळणावर भीषण अपघात झाला! खाजगी बसमधील सुमारे वीस प्रवाशांपैकी चार प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याची अधिकृत माहिती हाती आली आहे.
या बाबत महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आळेफाटा येथून सुमारे वीस प्रवासी घेऊन खाजगी सीटर टेम्पो ट्रॅव्हलर गाडी कल्याणच्या बाजूला जात होती.माळशेज घाटात वळणावर गाडी भरदाव वेगात जात होती.चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्या'ने हा अपघात झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला. घटनास्थळी पोलीस तात्काळ दाखल झाले.महामार्ग पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमींना महामार्ग पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी आळेफाटा आणि मुरबाड येथील रुग्णालयात जखमींना हलविण्यात आले.
आणे- माळशेज घाटात अनेक दिवसांपासून रस्ता दुरुस्तीचे कामे सुरू आहे.मात्र अद्याप कामे सुरू असल्यानेच अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे.