राजू कुकडे यांच्या समर्थनार्थ पत्रकार एकवटले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०१ फेब्रुवारी २०२१

राजू कुकडे यांच्या समर्थनार्थ पत्रकार एकवटलेचंद्रपूर/ प्रतिनिधी 

दिनांक १८/०१/२०२१ ला सायंकाळी ७.०० च्या दरम्यान वरोरा येथील बोर्डा चौकातील हॉटेल राजयोगजवळ राजू कुकडे हे आपल्या चारचाकी वाहनांत बसत असतांनाच तीन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोर आरोपी व त्यांना सुपारी देणाऱ्या खासदार बाळू धानोरकर यांच्यावर पत्रकार सरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे नोंद करून अटक करण्यात यावी, अन्यथा यापुढे सर्व पत्रकारांच्या संघटनामार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी असा इशारा दिला आहे. 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा चंद्रपूर जिल्हा सरचिटणिस तथा साप्ताहीक भुमीपूत्राची हाक (न्युज पोर्टल) चे संपादक राजू कुकडे यांनी खासदार बाळू धानोरकर यांच्यावर दैनिक सकाळ पोर्टलच्या फेसबुक वरील झालेल्या ट्रोल संदर्भात बातमी आपल्या न्युज पोर्टलवर दि.१७ जानेवारी ला प्रकाशित केली होती त्या बातमीमध्ये खासदार बाळू धानोरकर यांच्या विरोधात कुठलेही वक्तव्य नसतांना व फेसबुकवर झालेल्या ट्रोलचा संदर्भ घेत ती बातमी प्रकाशित झाली.  बातमी अशी का लिहिली? असा प्रश्न करून चंद्रपूरला भेटतो म्हणून सांगीतले. दरम्यान खासदार बाळू धानोरकर यांच्या समर्थकांनी संपादक राजु कुकडे यांना फोनवर भेटण्याची व तुम्ही कुठे आहात म्हणून माहिती घेतली होती. दिनांक १८/०१/२०२१ ला सायंकाळी ७.०० च्या दरम्यान वरोरा येथील बोर्डा चौकातील हॉटेल राजयोग जवळ राजू कुकडे हे आपल्या चारचाकी वाहनांत बसत असतांनाच तीन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई व डिजिटल मीडिया असोसिएशन यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख ,राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन मागील आठ दिवसांपूर्वी देण्यात आले.  पण तरीही हल्लेखोर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. आज एक फेब्रुवारी रोजी एकदिवसीय धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शासन प्रशासनाला निवेदन देण्यात आले. 

 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, डिजिटल मीडिया असोसिएशन, विदर्भ राज्य ग्रामीण शहरी पत्रकार संघ व बहुभाषिक पत्रकार संपादक बहुउद्देशीय संघाचे पदाधिकारी व पत्रकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.