परमानंद तिराणीक महाराष्ट्र प्राईड ऑफ इंडिया अवॉर्ड 2021 ने सन्मानित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२३ फेब्रुवारी २०२१

परमानंद तिराणीक महाराष्ट्र प्राईड ऑफ इंडिया अवॉर्ड 2021 ने सन्मानित
शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी) :
विविध क्षेत्रातील समाजाच्या आनंदासाठी झटणाऱ्या आणि कर्तृत्व उमटवणाऱ्या कार्यविरांचा अद्भुत सन्मान सोहळा वीणा इंटरनेशनल कोल्हापूर आणि जिव्हाळा कलामंच यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21/02/2021 ला कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक संमेलन 2021 पार पडला. या संमेलनाध्यक्ष मा. श्री, शिवकुमार मुरतले कोल्हापूर, उदघाटक मा.ऍड.एस. एन. काळे मुंबई हायकोर्ट,सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री मा. डॉ.समिरा गुजर (जोशी ),प्रमुख अतिथी मा.डॉ.नगिना माळी लेखिका सांगली,मा. सौ. शोभा जिनगी समाजसेविका , मा. श्री, कृष्णाजी हरगुडे स्वागताध्यक्ष व आयोजक श्री,सुनिल चव्हाण, यवतमाळ,प्रा. बी एन. खरात सिंधुदुर्ग, प्रमुख उपस्थिती डॉ.उमाकांत वानखेडे श्री, सुभाष भोसले, श्री, अमोल नाईक, सौ. अबोली मुल्ला या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री मा.डॉ.समिरा गुजर  यांचे शुभ हस्ते महाराष्ट्र प्राईड ऑफ इंडिया अवॉर्ड 2021 ने परमानंद तिराणीक आनंदवन,वरोरा जि. चंद्रपूर यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक कार्याची दखल घेऊन, कला साहित्य सांस्कृतिक संमेलन कोल्हापूर 2021 या सोहळ्यात छत्रपती शाहू स्मारक हॉल कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला. परमानंद तिराणीक त्यांचेवर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.