देवभूमीतील प्रकोपात 100 ते 150 लोक दगावले #uttarakhand - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ फेब्रुवारी २०२१

देवभूमीतील प्रकोपात 100 ते 150 लोक दगावले #uttarakhandउत्तराखंड: उत्तराखंडमध्ये झालेल्या नैसर्गिक प्रकोपात 100 ते 150 लोक दगावले असून अनेकजण बेपत्ता झाल्याची भीती उत्तराखंडचे मुख्यसचिव ओम प्रकाश यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत हे जोशीमठकडे रवाना झाले आहेत.

उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात धौली गंगा नदीत मोठा हिमकडा कोसळल्याने या नदीला महापूर आला आहे. तसेच धरणाचा बांध फुटल्याने नदीलगतच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक गावं पाण्याखाली गेली असून शेकडो लोक बेपत्ता झाल्याचं वृत्त आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 100 ते 150 लोक दगावल्याची भीती राज्याचे मुख्य सचिव ओम प्रकाश यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत स्वत: जोशीमठाकडे जायला निघाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तातडीने मुख्यमंत्री रावत यांच्याशी फोनवरून चर्चा केली असून त्यांना सर्वोतोपरी मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. आयटीबीपी आणि एनडीआरएफच्या टीमही उत्तराखंडला पाठवण्यात येत असल्याचं शहा यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट केलं. दरम्यान, देवभूमीतील लोकांना वाचवण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येणार असल्याचंही शहा यांनी सांगितलं.⭕पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी उतराखंडच्या दुर्घटनेबद्दल घेतला आढावा, दिली महत्त्वाची सूचना

उत्तराखंडमधील जोशी मठाजवळ हिमकडा कोसळून मोठी दुर्घटना घडली. हिमकडा कोसळून धरणाचा बांध फुटल्याने नदीला आलेल्या महापूरात अनेक जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. उत्तराखंडमधील दुर्देवी परिस्थितीवर मी सतत लक्ष ठेऊन आहे. संपूर्ण भारत तेथील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहे, अशी भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे.


तसंच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी सतत संपर्कात असून एनडीआरएफचे जवान तैनात असून तेथील मदतकार्याविषयी माहिती घेत असल्याचं मोदींनी सांगितलं आहे.