नागपुरात कोरोनाचा धोका कायम; केंद्राचे पथक नागपुरात, मुख्यमंत्र्यांनी दिला सतर्कतेचा इशारा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ फेब्रुवारी २०२१

नागपुरात कोरोनाचा धोका कायम; केंद्राचे पथक नागपुरात, मुख्यमंत्र्यांनी दिला सतर्कतेचा इशारानागपूरराज्यात #कोरोना मृत्यूचा दर २.५२ टक्के असतांना #नागपूरचा मृत्यू दर ३.०८ टक्के आहे मृत्यूचे कारणे शोधण्यासाठी, कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यू दर नियंत्रणात आणण्यासाठीकेंद्राचे त्रिसदस्यीय पथक दाखल झाले. 


राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं दिसत असलं तरी नागपूर आणि अमरावती विभाला अद्यापही धोका कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक घेतली.

या पथकाने विदर्भातील चार जिल्ह्यांबाबत काही निरीक्षणं नोंदवली आहे. अधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या निरीक्षणासंदर्भात नागपूर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी यंत्रणेला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. 


केंद्रीय पथकाकडून आढावा घेतल्यानंतर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, महाराष्ट्राने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाच्या नविन रुग्ण संख्येचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र शहरी भागापेक्षा नंदूरबार आणि भंडारा सारख्या ग्रामीण भागात रुग्णसंख्येचे प्रमाण का वाढत आहे? याचा गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. राज्यात आरोग्य सुविधेत कमतरता नाही, तरीही नागपूर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी आपल्या विभागातील यंत्रणा अधिक सतर्क कराव्या अशी सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.