बचतीची सवय महिलांनी स्वतःला लावून घ्यावी.- सरपंच अनिरुद्ध शहारे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२९ जानेवारी २०२१

बचतीची सवय महिलांनी स्वतःला लावून घ्यावी.- सरपंच अनिरुद्ध शहारे

बचतीची सवय महिलांनी स्वतःला लावून घ्यावी.- सरपंच अनिरुद्ध शहारेनवेगावबांध येथे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न.

महिला मंडळे व बचत गटाचे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन.


संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.29 जानेवारी:-
नवेगावबांध येथील महिला मंडळे व बचत गट यांच्यावतीने ग्रामपंचायत नवेगावबांध परिसरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम आज दिनांक 29 जानेवारी रोजी शुक्रवार ला आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य विजयाताई कापगते यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान जिल्हा परिषद गोंदिया च्या माजी उपाध्यक्ष रचनाताई गाहणे यांनी भुषविले होते.या वेळी अतिथी म्हणून ग्रामपंचायतचे सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार,संजीव बडोले, बचत गटाच्या समन्वयक हेमलता गुप्ता, ग्राम संघाच्या अध्यक्षा भिमाबाई शहारे, आरोग्य पर्यवेक्षिका रेखा पुराम, दुर्गा मांढरे, मीना चांदेवार, नीलम अग्निहोत्री, आशाताई पांडे, कलाबाई डोंगरवार, भाग्यश्री कोसरकर, विमल कापगते, रेखा कांबळे, निर्मलाबाई डोंगरवार, हरकू बाई काशीवार, पोर्णिमा शहारे उपस्थित होते.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून हळदीकुंकू कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.
सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारी कार्यामुळे आज स्त्रिया बोलू लागल्याआहेत. बचतीचे महत्त्व लक्षात घेऊन महिलांनी खर्चाबरोबरच, बचतीची सवय स्वतःला लावून घ्यावी. असे आवाहन सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी केले. 31 जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम आहे. पाच वर्षे वयापर्यंतच्या मुलांना त्यांच्या मातांनी पोलिओचा डोस आपल्या मुलांना द्यावे. असे आवाहन आरोग्य पर्यवेक्षिका रेखा पुराम यांनी यावेळी केले. बचत गटाचे व्यवस्थापन व महिलांच्या आर्थिक उत्थान याविषयी हेमलता गुप्ता यांनी महिलांना मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले यांनी  महिलांना शिक्षणाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून जो संदेश व जी संस्कार दिले त्याला अनुसरून मातृसक्तीने संघटित व्हावे. महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. आज सर्व क्षेत्रात  महिला पुरुषांच्या बरोबरीने  मैदानात उतरतात. सावित्रीबाई फुले यांना  महिलांकडून जे अपेक्षित होते, त्याची पूर्तता करण्याची वेळ आली आहे. अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा फायदा घेऊन महिलांनी आर्थिक आत्मोन्नती करावी. असे आव्हान रचनाताई गहाणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.
कार्यक्रमाचे संचालन ग्रामपंचायत सदस्य शीतल राऊत यांनी केले. तर उपस्थितांचे आभार लिलाबाई सांगोळकर ग्रामपंचायत सदस्य यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट अर्चना पंधरे,दुर्गाबाई मेश्राम, लताबाई आगाशे,गुणिता डोंगरवार, सविता बडोले, हर्षा बाळबुद्धे,महिला बचत गट,महिला मंडळाच्या  महिलांनी सहकार्य केले.हळदीकुंकू कार्यक्रमाला महिला मंडळ बचत गट चे पदाधिकारी, सदस्य तसेच नवेगावबांध बांध ग्रामस्थ महिला बहुसंख्येने उपस्थित होते.