#wildlife #News चपराळा परिसरात वाघाचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ जानेवारी २०२१

#wildlife #News चपराळा परिसरात वाघाचा मृत्यू
शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) :
भद्रावती वनपरिक्षेत्र अंतर्गत चपराळा परिसरात वाघाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 28 ला उघडकीस आली. या वाघाचा मृत्यू नेमका कशाने झाला याचा वनविभाग शोध घेत आहे.

चपराळा वन कक्ष क्रमांक 210 येथे वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती वनपाल यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी भद्रावती यांना दिली. या घटनेची माहिती होताचं वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. मृत्यू झालेला वाघ हा नर जातीचा असून त्याचे वय 13 वर्षे आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या मृत्यू वाघाचे शवविच्छेदन करून त्याला अग्नी देण्यात आली. वाघाचा नेमका मृत्यु कशाने झाला याचा शोध वनविभाग घेत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांनी वाघाचा मृत्यू त्याचे वय झाल्याने झाले असे त्यांनी सांगितले.