चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे हुतात्म्यांना श्रद्धांजली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

३१ जानेवारी २०२१

चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे हुतात्म्यांना श्रद्धांजली

चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे हुतात्म्यांना श्रद्धांजली

चंद्रपूर ३० जानेवारी - चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी हुतात्मा स्मारक येथे  शनिवार ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता दोन मिनिटे मौन बाळगून हुतात्मा दिन पाळण्यात आला. हुतात्मादिनाचे औचित्य साधून मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून तसेच जटपुरा गेट व गांधी चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी व  इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली.
    याप्रसंगी मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार म्हणाल्या की, भारतभुमीला स्वातंत्र्य मिळवुन देण्यासाठी ज्या शुरवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्यांचे आभार मानण्याचा आजचा दिवस आहे. क्रांतीची धगधगती मशाल हातात घेऊन देशात स्वातंत्र्याचा प्रकाश आणण्यासाठी ज्या हजारो हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांचा स्मृतीदिन म्हणुन जो दिवस साजरा केला जातो त्यादिवशी आपण हुतात्म्यांचे बलिदान न विसरण्याचा  संकल्प करायला हवा.  
   माजी अर्थमंत्री तथा लोकलेखा समितीचे प्रमुख श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री असतांना २०६ हुतात्मा स्मारकांच्या दुरुस्ती व नुतनीकरणासाठी पाच वर्षे २५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला होता.याच निधीतुन आपल्या शहरातील हुतात्मा स्मारकाचे नुतनीकरण करण्यात आले आहे व याचे लोकार्पण नुकतेच २६ जानेवारी करण्यात आले.      
     याप्रसंगी  आयुक्त राजेश मोहिते,उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त श्री. अशोक गराटे,  झोन सभापती श्री प्रशांत  चौधरी नगरसेविका सौ वंदना तिखे, सहायक आयुक्त शीतल वाकडे, धनंजय सरनाईक, विद्या पाटील, श्री.मनोज गोस्वामी, श्री. अनिल घुले, श्री. भाऊराव सोनटक्के, श्री युधिष्ठीर रैच ,श्री प्रदीप मडावी, श्री प्रदीप पाटील, विकास दानव, श्री गुरुदास नवले, श्री. मयूर मलिक उपस्थित होते