#Tiger #Nagpur : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोबाईलमध्ये कैद केला ‘वाघ आला रे वाघ आला’ - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२६ जानेवारी २०२१

#Tiger #Nagpur : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोबाईलमध्ये कैद केला ‘वाघ आला रे वाघ आला’


 

मुख्यमंत्री श्री #उद्धवठाकरे यांच्याहस्ते आज #नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

माणसाचा स्वभाव हा वाघासारखा असला पाहीजे. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे जगाव तर वाघासारख. त्यामुळेच आमचा झेड्यावरसुद्धा वाघाचा लोगो आहे. त्यामुळेच वाघाला साजेसे काम करणे गरजेचे झाले आहे. वाघासारखे काम केल्यानंतर ‘वाघ आला रे वाघ आला’ असे म्हटले तरी विरोधकांची दाणादाण उडेल, असा मिश्कील टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.मुख्यमंत्री यांच्या हस्ते आज नागपूर येथे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले त्यानंतर मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे जी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


मगाशी गाडीत बसल्यावर जे गाईड होते त्यांनी सांगितलं की आपण लकी असू तर आपल्याला बिबळ्या दिसेल. बिबळ्या दिसला, अस्वलाची ४ पिल्लं दिसली, राजकुमार वाघ पण दिसला म्हणजे सगळ्यांनी आपणहून येऊन मला भेटी दिलेल्या आहेत. मला खात्री आहे की तुम्हीसुद्धा तिथे गेल्यानंतर तुम्हालासुद्धा भेट देतील.


वाघासारखा स्वभाव असला पाहिजे. शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं आहे की, जगायचं तर वाघासारखं जगायचं, शेळी-मेंढी सारखं नाही जगायचं. म्हणून शिवसेनेचा सिम्बॉल वाघ घेतलेला आहे आणि त्या वाघाला साजेसं काम जर आपण केलं नाही तर नुसत्या घोषणा देण्यात काय अर्थ आहे... "कोण आला रे कोण आला!"