ताजुद्दीनबाबांविषयी राष्ट्रसंतांचा हा किस्सा वाचून व्हाल थक्क! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२७ जानेवारी २०२१

ताजुद्दीनबाबांविषयी राष्ट्रसंतांचा हा किस्सा वाचून व्हाल थक्क!

आज संत ताजुद्दिन बाबा यांचा जन्मदिवस त्यानिमित्त एक छोटीसी आठवण ह. भ. प.विजय महाराज नागपुरे यांच्या वॉल वरून
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (माणिकदेव) आणी संत ताजुद्दीनबाबा यांची भेट

नागपूर नगरीत त्याकाळी संत ताजुद्दीन बाबांचं नाव दुमदुमत होतं. त्यांचं मूळ नाव होतं मुबारक सय्यद ताजुद्दीन. पूर्वज अरबस्थानी. म्हैसूरप्रांतात स्थिर झालेले. वडील सेनेत सुभेदार. व्यापारानिमित्त कामठीला येऊन स्थायिक झाले. ताजुद्दीनबाबांनी अठरा वर्षाच्या वयापर्यंत अरबी- फारसी- इंग्रजी शिक्षण घेऊन सैन्यात काम केलं. दया, सेवाभाव नी प्रार्थनाप्रेम हे त्यांचे मुख्य जीवन. त्यांना तारुण्यातच ईश्वरी ज्ञान झालं नी सर्वस्व त्यागुन ते अलमस्त राहू लागले. 'निगाहे मर्दे मोमिनमसे बदल जाती है तकदीरे!' पण अज्ञ समाजाला त्याचं काय ज्ञान? वेडा समजून या अवलियाला सोळा वर्षे पागल खाण्यात डांबण्यात आलं!. पण तिथेही ते मस्त होते. राजे रघुजी भोसले यांनी जमानत घेऊन त्यांना सोडवलं. प्रथम ते वाकी ला राहिले. त्यांचं नाव अद्भुत चमत्कारांसह भारत भर झालं.
१९२० साली सद्भक्त राजे रघुजी भोसले यांनी त्यांना नागपूरला सक्करदरा इथे आणलं. गरीब-श्रीमंत, निरक्षर- पदवीधर आदि सर्वप्रकारचे स्त्री-पुरुष दर्शनार्थी बाबांकडे यायचे. त्यात मुस्लिम होते तसेच हिंदूही होते. जाती-धर्माची कल्पनाच त्या अवलीया जवळ नव्हती. रघुजीराजे स्वतः त्यांची बग्गी हाकीत. दर्शनार्थीची व्यवस्थाही तेच आस्थेन करीत, आणि ते मस्त अवलिया आपल्या शुभ आशीर्वादाची खैरात करीत असत. माणिकदेव रात्रीचे वेळीच त्यांच्या दर्शनाला गेला.

ताजुद्दिनबाबा निजानंदात।
'आया रे आया' पुटपुटत।
भिरभिरत्या नजरेने पाहात।
पोहोचले पोर हे तिथे।। (चरितामृत)
'आडकोजी का बेटा आयारे' म्हणत बाबांनी समोरच्या थाळीतले चिरंजीचे मुठभर दाने माणिक देवाकडे फेकले आणि ते हळुवार काहीतरी पुटपुटत राहिले.

माणिकदेवांन काही दाणे प्रसाद म्हणून वेचून घेतले आणि तो बाबांचा निरीक्षण करीत थोडावेळ तिथेच बसून राहिला.

ताजुद्दीनबाबांनी हात वर केला, तसा तो पुन्हा नमस्कार करून मार्गस्थ झाला.

त्यांच मन बोलत होत. -

भले मिय्या ताजुद्दिनबाबा।
जिसने तनका बनाया है काबा।।
पुरा अवलियापनमो राबा।
लहरीबहरी क-यो है जबाबा।।
रिद्धसिद्ध बनाकर दासी।। (अप्र१)

*संदर्भ - जीवनयोगी खंड २*
*लेखक -सुदामदादा सावरकर*

+++++++++++++++++
शिरडीत बंधू माझा, म्हणे आडकुजी।
दुजा भाऊ शेगावात, नांदतो अजी।।धु.।।

तिजा ताजुद्दीन अमुचा, मित्रजीव भावसाचा।
मुगंसाजी बंधू चवथा, आमुच्या भुजी।।१।।

साईखेडचा ही दादा, आमुचाची बंधू राजा।
खटेस्वराचीही माझी,संगती गुजी।।२।।

मायबाई माता अमुची,सर्वांभूती पान्हा पाजी ,म्हणे दास तुकडया यांची,भक्ती ना दुजी।।३।।

- वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

साभार
विजय नागपुरे
लोणारा (कळमेश्वर)