लवकरच होणार मक्‍याची खरेदी - सलील देशमुख - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ जानेवारी २०२१

लवकरच होणार मक्‍याची खरेदी - सलील देशमुख

लवकरच होणार मक्‍याची खरेदी - सलील देशमुख


छगन भुजबळ यांना निवेदन

मुंबईतील बैठकीनंतर निर्णय

नागपूर, प्रतिनिधी
काटोल व नरखेड तालुक्यात सरकारने दिलेल्या कोट्याप्रमाणे मक्‍याची खरेदी करण्यात आली. परंतु तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात मका शेतकऱ्यांकडे शिल्लक होता.त्यामुळे ही खरेदी तातडीने सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यानंतर भुजबळ यांनी खरेदी सुरू करण्याचे आश्वासन दिले.यामुळे ही खरेदी लवकरच सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी दिली.
काटोल व नरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात मक्‍याचे उत्पादन झाले आहे. परंतु सरकारने दिलेल्या कोट्यानुसार ही खरेदी पूर्ण झाली होती. असे असतानाही अनेक शेतकऱ्यांकडे मका हा घरीच होता. यामुळे शेतकऱ्यांनी मका खरेदी लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी सलील देशमुख यांच्याकडे मागणी केली होती. यावरून आज मंगळवारी मुंबई येथे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. मका खरेदी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत सलील देशमुख यांनी शेतकऱ्यांची व्यथा ही छगन भुजबळ यांच्यासमोर मांडली. महाविकास आघाडी ही शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे असल्याचे अनुकरण करीत छगन भुजबळ यांनी सुद्धा मका खरेदी सुरू करण्याचे आदेश काढले. लवकरच काटोल व नरखेड तालुक्यातील मका खरेदी सुरू होईल अशी माहिती सलील देशमुख यांनी दिली. सलील देशमुख यांच्यासोबत सतीश रेवकर, नितीन लेंडे सह इतर प्रतिनिधी उपस्थित होते.