नांदेड जिल्ह्यातील दिवशी येथील ५ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार व हत्या प्रकरणीचे पडसाद औरंगाबादेत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ जानेवारी २०२१

नांदेड जिल्ह्यातील दिवशी येथील ५ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार व हत्या प्रकरणीचे पडसाद औरंगाबादेत

नांदेड जिल्ह्यातील दिवशी येथील ५ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार व हत्या प्रकरणीचे पडसाद औरंगाबादेत


महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून निषेध.
औरंगाबाद प्रतिनिधी:- दि. २२ मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील दिवशी येथील ५ वर्षीय अंगा खांद्यावर खेळणाऱ्या चिमुकलीवर अत्याचार करुन गळा दाबून हत्या करून त्या चिमुकलीला फेकून दिल्याची दुर्दैवी घटना दि.२० जानेवारी रोजी घटना घडली या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते श्री राजीव सिलमवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह औरंगाबादचे मा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेब यांच्याकडे भोकर दिवशी येथील अत्याचाराने बळी पडलेली सदर घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून बालिकेची जात कोणती आहे हे न पाहता सर्व स्तरांतून सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेच्या निषेध तथा आरोपीस नवीन कायद्यानुसार फाशीची शिक्षा द्यावी अशा आशयाचे निवेदन विभागीय आयुक्तांकाडे समक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आले यावेळी आयुक्त केंद्रेकर यांनी शासनास आपल्या भावना कळवितो असे आश्वासन दिले.यावेळी ऍड.ओम तोटेवार सह,रमेश चाबिल्वाड,संतोशजी आनंदे,साईनाथ इसानकर,बी.जी. बोगुलवार,सदाशिव मोक्कमवार,व्यंकट आईट्वार,शुभम माडे, पठाण खायुमखान,साईनाथ पालेपवाड,सत्या तोटावार,आदित्य,असद बेग,साईनाथ हुरदुके,विलास कोल्हे, कासेवाड गुरुजी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर औरंगाबाद जिल्हाधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले. भोकर दिवशी येथील आदिवासी मंनेरवारलू समाजातील बालिकेवर झालेल्या या घटनेबद्दल संबंध महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून यामधे नांदेड,परभणी,जालना,सोलापूर,औरंगाबाद,हिंगोली,यवतमाळ,बीड येथे पडसाद उमटले असून तीव्र निषेध केला जात आहे यात आरोपीस कठोरात कठोर शिक्षेची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.