भाजपा आध्‍यात्मिक समन्‍वय आघाडीच्‍या जिल्‍हा ग्रामीण संयोजक पदी राजकुमार पाठक तर महानगर संयोजक पदी प्रा. शैलेंद्र शुक्‍ला यांची नियुक्‍ती - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२१ जानेवारी २०२१

भाजपा आध्‍यात्मिक समन्‍वय आघाडीच्‍या जिल्‍हा ग्रामीण संयोजक पदी राजकुमार पाठक तर महानगर संयोजक पदी प्रा. शैलेंद्र शुक्‍ला यांची नियुक्‍ती

भाजपा आध्‍यात्मिक समन्‍वय आघाडीच्‍या जिल्‍हा ग्रामीण संयोजक पदी राजकुमार पाठक तर महानगर संयोजक पदी प्रा. शैलेंद्र शुक्‍ला यांची नियुक्‍ती
चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी आध्‍यात्मिक समन्‍वय आघाडीच्‍या महाराष्‍ट्र प्रदेश कार्यकारीणीच्‍या सदस्‍या तसेच पुर्व विदर्भ सहसंयोजक श्रीमती शिल्‍पा देशकर यांनी भाजपा आध्‍यात्मिक समन्‍वय आघाडीची चंद्रपूर जिल्‍हा ग्रामीण आणि महानगर कार्यकारीणी जाहीर केली आहे. आध्‍यात्मिक समन्‍वय आघाडीच्‍या जिल्‍हा ग्रामीण संयोजक पदी राजकुमार पाठक यांची तर महानगर संयोजक पदी प्रा. शैलेंद्र शुक्‍ला यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.
आध्‍यात्मिक समन्‍वय आघाडीच्‍या जिल्‍हा ग्रामीण सहसंयोजक पदी दिपक महाराज पुरी, रमेश कंचर्लावार, अनंता अनिवाल, अनंता मत्‍ते यांची नियुक्‍ती करण्‍यात आली असुन, सदस्‍य पदी अनिल नित, अशोक संगीडवार, अरुण भोयर, दिलीप मॅकलवार, बबन गुंडावार, राजकुमार धामेजा, रामसेवक सिंग, प्रकाश खंजाची, हरीदत्‍त शर्मा, संध्‍या वासाडे यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. प्रसिध्‍दी प्रमुख पदी मुकरु सेलोटे, प्रतिक्षा धकाते, वर्षा गटलेवार यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

आध्‍यात्मिक समन्‍वय आघाडीच्‍या महानगर सहसंयोजक पदी सुनिल महाकाले, सौ. स्मिता रेभनकर, सुधाकरराव टिकले यांची नियुक्‍ती करण्‍यात आली असुन, सदस्‍य पदी विजय चिताडे, मनोज मालविय, सुरेश हरीरामानी, जुगल किशोर सोमानी, योगेश सप्रे, अमित देशपांडे, महेश कानपल्‍लीवार, अशोक शर्मा, विनोद सुचक, सौ. अश्विनी मोतलग, सौ. ज्‍योती मसराम, अमोल खडके, वासुदेव राठोड, महेश कल्‍लुरवार, राजेश द्रोण यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

आध्‍यात्मिक समन्‍वय आघाडीच्‍या नवनियुक्‍त पदाधिका-यांचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर, आ. किर्तीकुमार भांगडीया, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंह चंदेल, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, अॅड. संजय धोटे, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष मंगेश गुलवाडे आदींनी अभिनंदन केले आहे.