अखेर त्या कोंबड बाजारावर धाड; सहा आरोपी अटकेत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ जानेवारी २०२१

अखेर त्या कोंबड बाजारावर धाड; सहा आरोपी अटकेत



(शिरीष उगे/ भद्रावती प्रतिनिधी)-
तालुक्यातील तिरवंजा येथे कोंबड बाजारावर धाड टाकून मुद्देमालासह सहा आरोपीला पोलिसांनी अटक केली ही कारवाही सायंकाळी पाचच्या दरम्यान करण्यात आली.

यातील नंदकिशोर चौधरी वय 36 राहणार चपराळा, मुरसा हकीम शेख वय 55 राहणार दुर्गापूर, निलेश बावणे वय 39 राहणार तुकुम, पुरुषोत्तम गेडाम वय 47 राहणार चिंचोली, महेंद्र झाडे वय 38 राहणार पडोली असे आरोपीचे नावे आहे त्याचे कडून रोख रकम व वाहन असा 4 लाखाचा मुद्देमाल जप्त केला . कोंबड्यावर पैशाची बाजी लावून जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्याआधारे ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख अमोल तुळजेवार, हेमराज प्रधान, केशव चिटगिरे, रोहित चिटगिरे, शशांक बदामवार, नितेश ढेंगे यांनी कारवाई केली.