पुणे मेट्रो रेल प्रकल्पाने चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२५ जानेवारी २०२१

पुणे मेट्रो रेल प्रकल्पाने चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला

पुणे मेट्रो रेल प्रकल्पाने चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा केलापुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने 23.1.2021 रोजी पुणे मेट्रो प्रकल्पाचा चौथा वर्धापन दिवस साजरा केला. पुणे मेट्रोच्या फुगेवाडी कार्यालयात साजरा करण्यात आलेल्या या चौथ्या वर्धापन दिन समारंभात गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालय (एमओएचयूए) चे सचिव आणि दुर्गा शंकर मिश्रा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. चार वर्षांपूर्वी एक नविन सुरुवात पुणे मेट्रोने 3 कर्मचार्‍यांसह केली. अगदी कमी वेळात एक टीम तयार केली गेली, निविदा मागविण्यात आल्या आणि 6- 7 महिन्यांच्या कालावधीत पुणे मेट्रोच्या पहिल्या पियर्सचा   पाया पूर्ण करण्यात आला.

पुणे मेट्रोने आतापर्यंत सुमारे 48% काम पूर्ण केले असून 2021 मध्ये पुणेकरांना पुणे मेट्रोचे प्रत्यक्ष कामकाज पाहायला मिळेल. मेट्रोच्या कामाच्या प्रगतीवर कोरोना साथीच्या  परिणाम झाला आहे परंतु डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या नेतृत्वात महा मेट्रो टिमने पुणे मेट्रोच्या कामांचा वेग कमी होऊ न देण्याची योजना आखली आहे. श्री दुर्गा शंकर मिश्राचेअरमन महा मेट्रोडॉ. ब्रिजेश दीक्षितएमडी महा आणि मेट्रोचे अन्य संचालक यांनी व्हायाडक्टभूमिगतविद्युत कर्षणसिग्नलिंगटेलिकॉमभूसंपादनरोलिंग स्टॉकमेट्रो कार डेपोपीआयडीएसएमईपीच्या प्रगतीचा आढावा घेतला. महा मेट्रोच्या फुगेवाडी कार्यालयात आयोजित 24 व्या संचालक मंडळाच्या बैठकीत आणि इतर कामांचा आढावा घेण्यात आला . पुणे मेट्रोचा चौथा वर्धापन दिवस साजरा करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात श्री दुर्गा शंकर मिश्रा यांनी महा मेट्रोच्या अधिका ऱ्यांचे  अभिनंदन केले आणि टीम महा मेट्रोने केलेले चांगले काम सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या.

नंतर श्री दुर्गा शंकर मिश्रा यांनी संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनला भेट दिली. हे स्टेशन काहीच दिवसांत पूर्ण झालेले पहिले मेट्रो स्टेशन आहे आणि स्टेशनवर उपलब्ध असलेल्या गुणवत्तेची व सुविधा पाहून ते  समाधानी आहेत. तसेच संत तुकाराम नगर ते फुगेवाडी दरम्यानच्या तीन कोच मेट्रो ट्रेनमधील मार्गाची पाहणी केली. तीन कोच मेट्रो ट्रेन गेल्या एक वर्षापासून चाचण्यांसाठी वापरली जात होती आणि मेट्रो मार्गाचे सर्व पॅरामीटर्स तपासणे यावेळेस खूपच उपयुक्त ठरले. डॉ. ब्रिजेश दीक्षित एमडी महा मेट्रो यांनी संत तुकाराम नगर स्थानकात प्रवासी सुविधा पुरवल्या आहेत.

श्री दुर्गा शंकर मिश्रा यांनी पीसीएमसी ते खडकीबंडगार्डन ते आरटीओ आणि स्वारगेट मल्टि मोडल हब - भूमिगत स्थानकाच्या भागाची पाहणी केली. पुणे मेट्रो मेट्रोपीएमपीएमएलरिक्षाकार-टॅक्सी सेवा आणि पादचारी पथ यांना एकत्रित करून   जेधे चौक वाहतुक कोंडीतुन मुक्त करण्यासाठी तीन मजल्यांची  मल्टी मॉडेल हब स्वारगेट येथे बनवित आहे. आर्किटेक्ट आणि डिझाइनर्सच्या पथकाने स्वारगेट मल्टी मॉडेल हबची योजना आणि प्रगती समजावून सांगितली.  श्री अतुल गाडगीळ (संचालक कार्य) यांनी सांगितले की स्वारगेट येथे पुर्ण बांधणी करून  तिसरा टीबीएम लवकरच बोगद्याचे काम सुरू करेल. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत सिव्हील कोर्टाकडून दोन टीबीएम आणि स्वारगेट येथून एक टीबीएम यांचे कार्य वेगाने सुरू होईलयामुळे पुणे मेट्रोच्या रेंज हिल्स ते स्वारगेट  या भूमिगत 6 किलोमीटरच्या  बोगद्याचे काम वेगवान होईल.

श्री दुर्गा शंकर मिश्रा यांनी पुणे मेट्रोच्या कामकाजावर समाधानी होऊन पुणेकरांना मेट्रोचा दररोज प्रवास करण्यासाठी उपयोग करता यावा यासाठी त्यांनी हे काम वेगवान करण्याच्या सूचना दिल्या.