सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्‍स क्‍लबतर्फे अभिनव दिनदर्शिकेचे प्रकाशन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ जानेवारी २०२१

सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्‍स क्‍लबतर्फे अभिनव दिनदर्शिकेचे प्रकाशन

सुधीभाऊ मुनगंटीवार फॅन्‍स क्‍लबतर्फे अभिनव दिनदर्शिकेचे प्रकाशन

चंद्रपूर : राज्‍याचे माजी अर्थमंत्री तथा महाराष्‍ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख लोकनेते आ. सुधीभाऊ मुनगंटीवार यांनी केलेल्‍या सामाजिक कार्याची माहिती देणारी अभिनव पध्‍दतीची दिनदर्शिका सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्‍स क्‍लब बल्‍लारपूर या संघटनेच्‍या माध्‍यमातुन तयार करण्‍यात आली आहे. दिनांक 11 जानेवारी रोजी या दिनदर्शिकेचे प्रकाशन आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी भाजपाचे जिल्‍हा कोषाध्‍यक्ष राजीव गोलीवार यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. यावेळी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी संघटनेच्‍या पदाधिका-यांच्‍या कार्याचे कौतुक केले व त्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी सुधीरभाऊ फॅन्‍स क्‍लबचे अध्‍यक्ष श्रीकांत आंबेकर, अल्‍पसंख्‍यांक आघाडी अध्‍यक्ष सलीम नबी अहमद, सुधाकर सिक्‍का, कमल वर्मा, शशिकांत मुंडे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.