चिमुकलीची बलात्कार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ औरंगाबाद येथे जाहीर निषेध - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२५ जानेवारी २०२१

चिमुकलीची बलात्कार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ औरंगाबाद येथे जाहीर निषेध

नांदेड जिल्ह्यातील आदिवासी समाजातील मुलगी

श्रद्धांजली अर्पण                                                                     औरंगाबाद:- प्रतिनिधि-दि.24/01/2021.                          नांदेड जिल्ह्यात पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिचा गळा दाबून जिवे मारून नदीपात्रात फेकून दिल्याची घटना भोकर तालुक्यातील दिवशी बु. येथे दिनांक 20/01/2021 रोजी घडली या घटनेच्या निषेधार्थ औरंगाबाद शहरातील मुख्य ठिकाण असलेल्या पैठण गेट या ठिकाणी शहरातील विविध भागातून सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन या घटनेचा तीव्र निषेध नोंदवित त्या  बालिकेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दिवशी ता भोकर जि नांदेड येथील पाच वर्षाच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या एका निरागस  बालिकेवर त्यांच्याच घरात सालगडी असलेल्या 42 वर्षीय नराधमाने घरच्यांची नजर चुकवून माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य आपल्या नातीच्या वयाच्या समान असलेल्या चिमुकलीवर आनैसर्गिकपणे अत्याचार करून तिची अमानुषपणे हत्या केली.
अशा क्रूर घटना समाजामध्ये वाढत आहेत या घटनेला कुठे ना कुठे आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कठोरात कठोर शिक्षेची तरतूद लवकरात लवकर करावी व त्या  नराधमास सहकार्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी सर्वत्र होताना दिसत आहे. नांदेड जिल्ह्यातील मौजे दिवशी येथील आदिवासी मन्नेरवारलू कुटुंबावर घडलेल्या घटनेमुळे जनतेत मोठे भीतीचे वातावरण तयार होत आहे या गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सबंध महाराष्ट्रातून पुढे येत आहे या घटनेच्या निषेधार्थ मराठवाड्यासह संपूर्ण राज्यभरातून विविध जिल्ह्यामध्ये त्या निरागस मुलीची कुठली जात आहे हे न पाहता सर्व स्तरातून आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी.तसेच अशा नीच प्रवृत्तीचे लोक यापुढे असे कृत्य करणार नाहीत याकरिता शासनाने योग्य पावुले उचलावीत.
या मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी औरंगाबाद शहरामध्ये आज दिनांक 24/01/2021 रोजी सायंकाळी 06 वाजता शहरातील गजबजलेल्या पैठण गेट याठिकाणी अप्पर तहसीलदार श्री रमेश मुंडलोड साहेब,तालुका कृषि अधिकारी श्री.व्यंकट टक्के,शासकीय मुद्रणालय चे अधिकारी श्री.बी.जी. बोगुलवार, एल आय सी विकास अधिकारी श्री संतोष आनंदे, एस बी आय चे अधिकारी श्री अभिजीत तोटेवार,माधवराव नीलावाड, राजुभाऊ सिलमवार आदी समाज बांधवांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी श्री सदाशिव पुपूलवाड,सौ.ज्योती पूपुलवाड,कु. सुवर्णा गोविंदवार,गणेश तोटावार गुरुजी यांनी आपल्या भाषणातून श्रद्धांजली वाहिली.यावेळी औरंगाबाद येथील सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते श्री रमेश छबिलवाड, साईनाथ इसानकर,बालाजी तोटेवाड,सत्यनारायण तोटेवाड,शुभम माडे,सौ.स्मिताताई पिरतवाड यांनी परिश्रम घेतले. यावेळी मारोती नीलावाड ,Adv. अनिल पिरतवाड, Adv. ओम तोटावाड,राम देउलवाड, माधव निलावाड,सुभाष मुपडे, कोलामवाड हरिनाम, परोडवाड साहेब, एकनाथ गधपवाड,फटाले, बास्टे, अरविंद टेकले, कार्तिक गंधपवाड,सचिन कंगुलवार, तुमोड, आकाश पेरके, देशटवाड,सदानंद देशपांडे, वेंकट आईटवाड,रवी उस्केमवाड,साई पालेपवाड, गत्तुवार अरुणकुमार लहूपंचांग, अंबरीश बोडले,राजू गोल्लेवार, साहेबराव आईट्वार,श्री.आदमवाड,श्री.जक्केवाड,सोनाजी कासेवाड,श्री टेकले,अंदेलवाड, मांजरमे,सौ.कांता देऊलवाड,सौ. सुनिताताई निलावाड,सौ.पुदलवाड, सौ.संध्या पुपूलवाड,सौ अल्का माडे,सौ. उषा तुमोड,सौ. सौ.आकुल्वार,सौ कर्णे,सौ. वारकड ,सौ.खरबे,सौ.पडलवार ताई,सौ रेखाताई गोविंदवार आदी महिला भगिनी विद्यार्थी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.उपस्थिताचे आभार श्री राजुभाऊ सिलमवार यांनी केले.