निप्पॉंन डेन्ड्रोच्या जागेवर नवीन प्रकल्प उभारा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२१ जानेवारी २०२१

निप्पॉंन डेन्ड्रोच्या जागेवर नवीन प्रकल्प उभारा

भद्रावतीचे नगराध्यक्षांची केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरीकङे केली मागणी

शिरीष उगे (भद्रावती) : गेल्या २६ वर्षांपासून भद्रावती तालुक्यातील वीज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेली ११८३. २३ हेक्तर नवीन अद्यापावेतो कोणताही प्रकल्प न झाल्याने हि जागा नवीन प्रकल्पाच्या प्रतीक्षेत आहे. उपरोक्त संपादित जमीन निप्पॉंन डेन्ड्रोच्या नावाने असून सध्यस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या ताब्यात आहे. कोणत्याही मोठ्या प्रकल्पाला आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. आज नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी जमिनीच्या व प्रकल्पाच्या संबधी फाईल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिली. यावेळी विविध समस्या देखील नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे ठेवल्या. लवकरच सर्व प्रश्न निकाली काढण्याची ग्वाही त्यांनी दिली.
आज दि. २१ जानेवारी रोज गुरूवारला ना. नितीन गडकरी यांनी स्थानिक ग्रामोदय संघाला सदिच्छा भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी ना. नितीन गडकरी यांना सदस्य प्रकल्पासंबंधीची सविस्तर माहिती दिली.चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील पिपरी, ढोरवासा, तेलवासा, कुंनाडा, टोला, चारगाव, विजासन, लोणार रिठ, रुयाल रीठ व चिरादेवी या गावातील हद्द शेतकऱ्याची ११८३. हेक्टर शेतजमीन सन १९९४-९५ मध्ये निप्पॉंन डेन्ड्रो वीज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. गेल्या २६ वर्षांपासून उपरोक्त जमिनीवर कोणताही प्रकल्प नाही. जमीन पंडित आहे. संपादित क्षेत्राची अंदाजे लांबी ३५०० मीटर व रुंदी १५०० मीटर आहे. भद्रावती शहरापासून सदर जागा सात कि. मीअंतरावर आहे. मुख्य म्हणजे मोठ्या प्रमाणात कोळसा, वर्धा नदीचे मुबलक पाणी, रेल्वेची मुख्य लाईन, वीज साठविण्यासाठी जवळच असलेले पॉवर ग्रीड, जवळूनच गेलेल्या कचा दाबाच्या विद्युत वाहिन्या या पायाभूत सुविधा या ठिकाणी आहे. या ठिकाणी प्रकल्प झाल्यास भद्रावती परिसरातील रोजगार निर्मिती होऊ शकते तसेच बाजारपेठेवर सुद्धा सकारात्मक परिणाम होऊ शकते. या प्रकल्पामुळे या परिसरातील बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्यामुळे हा प्रकल्प त्वरीत करण्याची विनंती नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केली. त्यासोबतच केसुर्ली व विजापूर येथील शासकीय जागेवर पर्यटनस्थळ व उद्योग उभारणे त्यासोबतच चंद्रपूर- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपूर्ण सर्व्हिस रोड व विद्युत व्यवस्था पूर्ण करण्याची मागणी करण्यात आले. वरील सर्व प्रश्न त्वरित मार्गी लावणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.