युवा कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२९ जानेवारी २०२१

युवा कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश


#राष्ट्रवादीपरिवारसंवाद यात्रेदरम्यान प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil यांनी #चंद्रपूर शहरात आढावा बैठक घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी इतर पक्षातील युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

लोकांच्या मनात पक्षाविषयी आस्था निर्माण करणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे काम आहे. पक्षाने मोठ्या अपेक्षा ठेऊन आपल्याला पद दिलेलं असतं. त्याप्रमाणे आपण कामगिरी करायला हवी. पक्षाच्या विश्वासावर खरं ठरणं ही आपली जबाबदारी आहे, असे मार्गदर्शन ना. @Jayant_R_Patil यांनी केले.

देशामध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न एका बाजूला होताना दिसत आहे. २६ जानेवारी रोजी दिल्लीत जे काही घडलं त्याचं कुणीच समर्थन करत नाही. पण त्यानिमित्ताने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये - ना.