नवेगाव- नागझिरा भेट देणाऱ्या पर्यटकांना ५० टक्के सवलत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२६ जानेवारी २०२१

नवेगाव- नागझिरा भेट देणाऱ्या पर्यटकांना ५० टक्के सवलत

नवेगाव- नागझिरा भेट देणाऱ्या पर्यटकांना ५० टक्के सवलत


वन्यप्राणी व निसर्गप्रेमी
पर्यटकांना रिपब्लिक डे ऑफर.


संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.25 जानेवारी:-
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पुढील पंधरवाड्यात पर्यटनांचा लाभ जास्तीत जास्त निसर्ग प्रेमींना व्हावा या उद्देशाने नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे .
नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील नवेगाव ब्लॉक मधील खोली, बकी, जांभळी, पितांबरटोला या प्रवेशद्वारावरून २६ जानेवारी ते ८ फ़रवरी २०२१ च्या दरम्यान प्रवेश करणाऱ्या पर्यटकांना प्रवेश फी व वाहन फी मध्ये ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. प्रवेश फी १०० रुपये ऐवजी ५० रुपये व वाहन फी ३०० रुपये ऐवजी १५० रुपये राहणार आहे. तसेच २६ जानेवारी ते ८ फेब्रुवारीच्या दरम्यान नवेगाव ब्लॉक मधील खोली,बकी,जांभळी व पितांबरटोला या प्रवेश द्वारावरुन ऑनलाईन बुकिंग केली असल्यास त्यांचे प्रवेश फी व वाहन फी ची ५० टक्के रक्कम परत करण्यात येईल.सदर सवलत फक्त ८ फरवरी २०२१ पर्यंत आहे. तरी सर्व निसर्गप्रेमींना या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन गोंदीयाचे नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे प्रभारी विभागीय वन अधिकारी व्ही.के. बोऱ्हाडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.