शिवसेना स्वीकृत नगरसेवकपदी नरेंद्र भालचंद्र तांबोळी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ जानेवारी २०२१

शिवसेना स्वीकृत नगरसेवकपदी नरेंद्र भालचंद्र तांबोळी
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर नगर परिषदेतील शिवसेना स्वीकृत नगरसेवकपदी नरेंद्र भालचंद्र तांबोळी ह्यांची निवड करण्यात आल्याचे पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष शाम पांडे यांनी जाहीर केले
शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक वैभव मलठणकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर तांबोळी यांची निवड सर्वानुमते जाहीर करण्यात आली जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे या पदाकरिता त्यांचा अर्ज दाखल झालेला होता प्रांताधिकारी यांनी हा अर्ज वैध ठरविला त्यानंतर नगर परिषद सभागृहात आयोजित विशेष सभेत नगराध्यक्ष यांनी ही निवड जाहीर केली यावेळी उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी , गटनेते समीर भगत , फिरोज पठाण , जमीर कागदी , नगरसेविका अंकिता गोसावी , अश्विनी गवळी , हाजरा इनामदार , सना मन्सूरी , कविता गुंजाळ , सुवर्णा बनकर, समिना शेख आदींसह शहर प्रमुख चंद्रकांत डोके , माऊली होगे , विशाल परदेशी , कैलास गायकवाड , युसूफ शेख , सचिन कालेकर , रामभाऊ मिरगुंडे , शिवाजी पवार , बाळासाहेब साळवी , यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते दरम्यान भाजपा चे जुन्नर शहर अध्यक्ष व जिल्हा कार्यकारणी सदस्य नरेंद्र तांबोळी यांनी या पदांचा राजीनामा देऊन शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव व माजी आमदार शरद सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर त्यांची नियुक्ती स्वीकृत नगरसेवक या पदावर करण्याचे शिवसेनेने निश्चित केले नगराध्यक्ष शाम पांडे यांनी राजकीय खेळी खेळत भाजप शहर अध्यक्षाला शिवसेनेत घेऊन त्याला हे पद देण्याकरिता महत्वपूर्ण कामगिरी बजावली आगामी काळात या पदाच्या माध्यमातून शिवसेनेचे काम शहरात तळागाळापर्यंत पोहचविण्याचे कार्य करणार असल्याचे नवनियुक्त नगरसेवक तांबोळी यांनी निवडी नंतर जाहीर केले