नागपूर शहराला जगातील प्रथम क्रमांकाच स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्याचा संकल्प सर्वांनी करावा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत



२५ जानेवारी २०२१

नागपूर शहराला जगातील प्रथम क्रमांकाच स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्याचा संकल्प सर्वांनी करावा

नागपूर शहराला जगातील प्रथम क्रमांकाच स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्याचा संकल्प सर्वांनी करावा



केंद्रीय रस्ते वाहतूक, आणि केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच आवाहन

गडकरींच्या हस्ते हिंगणा टी पॉइंट ते छत्रपती चौक दरम्यान असणाऱ्या रस्त्याचे लोकार्पण संपन्नन


नागपूर 24 जाने 21: नागपूर शहरात विविध यंत्रणा द्वारे चालू असलेल्या विकासकामांमुळे जगातील प्रथम क्रमांकाच स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्याचा संकल्प सर्वांनी करावा असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक, आणि केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात केलं. सार्जनिक बांधकाम विभागातर्फे शहरातील हिंगणा टी पॉइंट ते छत्रपती चौक दरम्यान असणाऱ्या रस्त्याचे  लोकार्पण आज त्यांच्या हस्ते पार पडलं त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि दक्षिण पश्चिम नागपूरचे आमदार देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी, विधान परिषदेचे आमदार प्रवीण दटके माजी आमदार सुधाकर देशमुख , अनिल सोले, माजी खासदार दत्ता मेघे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

स्थानिक वर्धा रोडवरील छत्रपती चौकापासून सुरू झालेला हा सिमेंट काँक्रिटीकरणचा रस्ता शहराच्या बाह्य भागाला  जोडणार असून यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून शहराच्या विविध भागात जाणे-येणे सोपे होणार आहे.    28 किलोमीटरचा हा केंद्रीय  रस्ते   निधीमधून (सी.आर.एफ.)  273 कोटी रुपये खर्चून तयार झालेला आहेसिमेंट काँक्रिटीकरण असलेल्या रस्त्यावर वृक्षारोपण करण्यासाठी सेल्फ वॉटरिंग पाइप लावले असून अशा झाडांची काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा गडकरी यांनी या क्षेत्रातील नागरिकांना तसेच मनपाच्या पदाधिकाऱ्यांना केलाअशाच प्रकारचा एक बाह्य वळण रसता  दुसऱ्या भागात सुद्धा 1,200 कोटी रुपयांच्या तरतुदीने   पूर्ण होईल अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली.

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात नागपूरच्या दक्षिण  पश्चिम या क्षेत्रामध्ये सुमारे 86 हजार कोटीची कामे केलीदेवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काळात 1 हजार कोटी हे दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्वेंशन सेंटर तसेच खेळांच्या मैदानासाठी दिलेले आहेतत्यांच्या प्रयत्नातून एमएमआरडीएद्वारे 60 खेळांची मैदाने नागपूर शहरातच तयार आहेतत्याचा विशेष उल्लेख गडकरी यांनी यावेळी केला.

ब्रॉडगेज रेल्वेमुळे विदर्भातील जिल्हे सॅटेलाइट सिटीज म्हणून तयार होतील आणि या भागातील तरुणांना काम मिळेल अशी माहिती त्यांनी ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाविषयी बोलताना दिली.नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानाची निविदा प्रक्रिया पुन्हा राज्य सरकारने काढावी हे काम रखडू नये अशी विनंती त्यांनी राज्य शासनाला यादरम्यान केली.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याची संस्कृती  गडकरी  यांनी देशात आणि नागपुरात  आणली असं यावेळी नमूद केलंसदर सिमेंट काँक्रीटचा रोड यावरील वृक्षारोपणामुळे  ग्रीन रोड सुद्धा होत आहे