मूल येथील शासकीय आधारभुत धान खरेदी केंद्र बंद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१३ जानेवारी २०२१

मूल येथील शासकीय आधारभुत धान खरेदी केंद्र बंद

 मूल येथील शासकीय आधारभुत धान खरेदी केंद्र बंद

मूल:- खरेदी केंद्रावर खरेदी करण्याकरिता जागा उपलब्ध नसल्यामूळे मागील ८ दिवसापासुन येथील खरेदी केंद्र बंद आहे. 

 मूल तालूका धान उत्पादक  पट्टा आहे. मुल येथे शासकीय हमीभावाने धान खरेदी केंद्र उघडण्यात आलेले अाहे. सदर केंद्र कृषी उत्पन्न बाजार समिती,मूल येथे

उघडण्यांत आलेले आहे. सदर केंद्रावर धान विक्री करिता शेतकऱ्यांनी माहे नोव्हेंबर,२०२० पासुन नोंदणी करिता अर्ज सादर करण्यांत आलेले आहे. 

आजपर्यत ११५१ अर्ज खरेदी केंद्राला प्राप्त झालेले असून प्राप्त झालेल्या अर्जापैकी फक्त २६५ शेतकऱ्यांचे

९७४२.३५ क्विंटल धान खरेदी करण्यात आले आहे. उर्वरीत ८८६ शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहे.

खरेदी केंद्रावर खरेदी करण्याकरिता जागा उपलब्ध नसल्यामूळे मागील ८ दिवसापासुन खरेदी केंद्र

बंद आहे. त्यामूळे, नोंदणी करिता अर्ज सादर करणाऱ्या शेतकऱ्यांना खरेदी केंद्र कधी सुरू होणार याची प्रतिक्षा करावी लागत आहे. 

खरेदी केंद्र बंद केल्यास धान कुठे विकावा याबाबत शेतकरी संभ्रमास्थेत  आहे. खरेदी केंद्रावरील खरेदी करण्यांत आलेला शेतमाल तात्काळ

उचल करण्यात यावा आणि  नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे धान त्वरीत खरेदी करण्यात यावे अशी मागणी येथील शेतकरी विनोद  कामडे यांच्या सह इतर शेतक-यांनी केली आहे.