अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर बाजार समितीतील आधारभुत खरेदी केंद्र पुर्ववत सरू, शेतक-यांनी लाभ घेण्याचे आवाहन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० जानेवारी २०२१

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर बाजार समितीतील आधारभुत खरेदी केंद्र पुर्ववत सरू, शेतक-यांनी लाभ घेण्याचे आवाहन

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर बाजार समितीतील आधारभुत खरेदी केंद्र पुर्ववत सरू, शेतक-यांनी लाभ घेण्याचे आवाहन


मूल.ता.-धान उत्पादकांसाठी शासनाने जाहीर केलेली बोनस रक्कम शेतक-यांना पर्वणीच ठरली आहे. बोनस रकमेच्या आकर्शणाने धान उत्पादक शेतक-यांनी येथील बाजार समितीतील आधारभुत खरेदी केंद्रामध्ये मोठयाप्रमाणात नोंदणी करून धानाची विक्री केली. बाजार समितीने 9 हजार 747 क्विंटल धानाची आधारभुत किंमतीने विक्रमी खरेदी केली. सर्व गोदाम फुल्ल झाल्याने आणि जिल्हा मार्केटींग अधिका-यांकडुन माल उचल करण्यात विलंब होत असल्याने 29 डिसेंबर ला बाजार समितीने खरेदी बंद केली होती. आधारभुत दराने होणारी शासकीय खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतक-यांना असुरक्षीतता वाटु लागली. मात्र आज ता. 19 जानेवारी पासुन जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयामार्फत माल उचल परवाना जारी करण्यात आल्याने बाजार समिती आधारभुत खरेदी केंद्राने खरेदी केलेल्या मालाची उचल होऊ लागली आहे. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने आधारभुत खरेदी केंद्रासाठी नोंदणी केलेल्या शेतक-यांच्या मालाची खरेदी सुरू केल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. शेतक-यांनी आधारभुत केंद्रात माल दिल्यास आधारभुत किंमतीसह प्रतीक्विंटल 700 रूपये बोनस दिल्या जाते.
आधारभुत खरेदी केंद्र पुर्ववत सुरू झाले असुन सर्व नोंदणी केलेल्या शेतक-यांनी शासनाच्या याोजनेच्या लाभ घेण्याचे आवाहन बाजार समितीचे सचिव चतुर मोहुर्ले यांनी केले आहे.