महावितरण चंद्रपूर परिमंडळाद्वारे ग्राहकांच्या समस्या निवारण्यासएक गाव-एक दिवस उपक्रमास सुरुवात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२१ जानेवारी २०२१

महावितरण चंद्रपूर परिमंडळाद्वारे ग्राहकांच्या समस्या निवारण्यासएक गाव-एक दिवस उपक्रमास सुरुवातचंद्रपूर/खबरबात:
थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी या त्रिसुत्री मोहिमेतील एक गाव-एक दिवस या महावितरणच्या उपक्रमाअंतर्गत दिनांक 19 जानेवारी 2021 रोजी बल्लारषा विभागांतर्गत वरूड रोड या गावी सदर उपक्रम घ्ेाण्यात आला व 113 दुरूस्तीची कामे,1 कृषीपंप जोडणी देण्यात येवुन इतर 43 तक्रारींचा निपटारा करण्यात आला. याप्रसंगी नुकतेच जाहिर झालेले कृषी धोरण 2020 बाबत माहिती तसेच वीजबिलाची थकबाकी वसूलीसंदर्भात ग्रामपंचायतींचा सहभाग यावरही मार्गदर्षन करण्यात आले.
याप्रसंगी आमदार मा. श्री. सुभाषजी घोटे, राजूरा विधानसभा क्षेत्र हे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. सुनिल देषपांडे यंानी स्वतः उपस्थित राहून ग्राहकंाच्या तक्रारी समजून घेतल्या. चंद्रपूर परिमंडल कार्यक्षेत्रात येणार्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे.
या अगोदर मागील वर्षी ही सदर मोहीम जिल्ह्यात राबवली असता चंद्रपूर जिल्ह्यात 68 गावांमध्य एकत्रित 968 तक्रारींचे निवारण करण्यात आले होते. महावितरणचे नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम येत्या काळात अधिक गतिशील करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री.सुनिल देषपांडे यांनी दिली.
ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठ्याासाठी वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती तसेच प्रत्यक्ष गावातच नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देणे आणि वीजबिल व मीटर रिडींग संदर्भात असलेल्या तक्रारींचे जागेवरच निराकरण करणे यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुक्यातील काही गावात एक गाव - एक दिवस हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या मोहिमेत गावकर्यांशी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी थेट संवाद साधून मोबाईल अँप, वीजसुरक्षा व ग्राहक सेवेबाबतच प्रबोधन करण्यात येत आहे.
महावितरणकडून करण्यात येणार्या कामामध्ये तारांमधील झोल काढणे, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणार्या, झाडाच्या फांद्या तोडणे, पीन व डिस्क इन्सूलेटर बदलणे, वितरण रोहित्रांना अर्थिंग करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्सची स्वच्छता व आवश्यक दुरुस्ती, किटकॅट बदलणे, गांजलेले वीजखांब बदलणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, नादुरुस्त व धोकादायक सर्वि्हस वायर्स बदलणे आदी कामांचा समावेश आहे. याशिवाय सदोष व नादुरुस्त वीजमीटर बदलणे, वीजबिलांची दुरुस्ती, वीजमीटरची तपासणी, नावात बदल, वीजदेयके मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणे, मीटर घराबाहेर काढणे अशा प्रकारची कामे करण्यात येणार आहेत.
एक गाव एक दिवस या उपक्रमाची पूर्वमाहिती दिल्यानंतर संबंधीत गावात महावितरणचे अभियंता व जनमित्र तसेच बिलिंग स्टॉफ एकाच दिवशी ग्राहकसेवेचे काम करीत आहेत. वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्तीचे कामे तसेच इतर ग्राहकसेवा गावातच उपलब्ध होत असल्याने ग्रामस्थ मोठ्याा आनंदाने महावितरणला सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. मुख्य अभियंता श्री.सुनिल देषपांडे,चंद्रपूर मंडल कार्यालयाच्या अधीक्षक अभियंत्या श्रीमती संध्या चिवंडे, चंद्रपूर,वरोरा व बल्लारषा विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच उपकार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता हे विषेष परिश्रम घेत आहेत. सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात येत हि मोहिम राबविण्यात येत आहे.
31जानेवारीपर्यंत 2021 मोहीम चंद्रपूर परिमंडळात सर्वत्र राबविल्या जाणार असून वीज ग्राहकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री.सुनिल देषपांडे यांनी केले आहे.