युवकांचे मन, मनगट आणि मेंदू सशक्त देशाच्या निर्माणासाठी महत्वाचे : मनोज वठे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ जानेवारी २०२१

युवकांचे मन, मनगट आणि मेंदू सशक्त देशाच्या निर्माणासाठी महत्वाचे : मनोज वठे


युवकांचे मन, मनगट आणि मेंदू सशक्त देशाच्या निर्माणासाठी महत्वाचे : मनोज वठे.


युवकांचे मन, मनगट आणि मेंदू सशक्त देशाच्या निर्माणासाठी महत्वाचे : मनोज वठे.
ब्रम्हपुरी -भारतीय जनता युवा मोर्चा ब्रम्हपुरी तालुका व शहराच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती येथील भाजपा कार्यालयात साजरी करण्यात आली. स्वामी विवेकानंद जयंती निमित्त देशभरात युवा दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वर्षातील पाच कार्यक्रमांपैकी युवा दिन हा एक प्रमुख दिवस आहे. या कार्यक्रमाला वक्ते म्हणून भाजपा शहर महामंत्री तथा नगरसेवक मनोज वठे तर अध्यक्षस्थानी पं.स सभापती प्रा.रामलाल दोनाडकर उपस्थित होते.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या स्वप्नातील भारत देश घडविण्यासाठी युवकांनी राजमाता जिजाऊ व योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी पुढे जाण्याची गरज असल्याचे भाजपा महामंत्री मनोज वठे यांनी सांगितले.

कार्यक्रमाला प्रेमलाल धोटे, भा.ज.यु.मो जिल्हा उपाध्यक्ष तथा पं. स सदस्य प्रकाश नन्नावरे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रा.सुयोग बाळबुधे, युवा मोर्चा जिल्हा सचिव तनय देशकर, जिल्हा कार्यकरिणी सदस्य लिलाराम राऊत, शहर महामंत्री रितेश दशमवार, महामंत्री स्वप्नील अलगदेवें, सचिव दत्ता येरावार, भाजपा ओबीसी आघाडीचे शहर अध्यक्ष पंकज माकोडे, अमित रोकडे, अरुण बनकर, क्रीष्णा वैद्य, गणेश भानारकर व सुरेश बनपूरकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचनल भा.ज.यु.मो जिल्हा सचिव तनय देशकर यांनी केले तर आभार भा.ज.यु.मो शहर अध्यक्ष प्राचार्य. सुयोग बाळबुधे यांनी मानले.