वेकोलीच्या मान कंपणीत स्थानिकांना रोजगार देण्यात यावा, यंग चांदा ब्रिगेडची मागणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२५ जानेवारी २०२१

वेकोलीच्या मान कंपणीत स्थानिकांना रोजगार देण्यात यावा, यंग चांदा ब्रिगेडची मागणी

वेकोलीच्या मान कंपणीत स्थानिकांना रोजगार देण्यात यावा, यंग चांदा ब्रिगेडची मागणी


चंद्रपूर : वेकोली अंतर्गत लालपेठ ओपनकास्ट येथे काम करत असलेल्या मान कंपणीत स्थानिकांना रोजगार देण्यात यावा अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने वेकोली चंद्रपूर क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक यांना देण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप, विलास वनकर, राम जंगम, तिरुपती कलगुरुवार, संतोष कुर्रा, सुरेश गोलेवार, वेनू कोडेल, अशोक गद्दामवार, इसरैल चेंनूरवार आदिंची उपस्थिती होती.
चंद्रपूर हा औदयोगीक जिल्हा असला तरी येथे बेरोजगारांची संख्या अधिक आहे. त्यामूळे येथील उदयोगांमधील रोजगारात स्थानीकांना प्राधान्य देण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्याण यंग चांदा ब्रिगेडच्या शिष्ट मंडळाने वेकोली चंद्रपूर क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक यांची भेट घेत वेकोलीत अंतर्गत येणा-या मान कंपणीमध्ये स्थानीकांना रोजगार देण्याची मागणी केली आहे. यावेळी मुख्य महाप्रबंधक यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून याबाबत मुख्य महाप्रबंधक यांनीही सकारात्मक भुमीका घेण्याचे आश्वासन दिले आहे.