लग्नास नकार देणा-या मैत्रिणीच्या वडिलावर शस्त्राने हल्ला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ जानेवारी २०२१

लग्नास नकार देणा-या मैत्रिणीच्या वडिलावर शस्त्राने हल्ला

लग्नास नकार देणा-या मैत्रिणीच्या वडिलावर शस्त्राने हल्ला


नागपूर- लग्नास नकार देणाèया मैत्रिणीच्या वडिलावर शस्त्राने हल्ला केला. ही घटना कळमना पोलिस ठाण्याअंतर्गत घडली. गौरव ठाकूर, रा. पारडी असे आरोपीचे नाव आहे.
पीडित युवती दोन बहिण व वडीलासह राहते. ती बाराव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. गेल्या वर्षभरापासून गौरव सोबत तिची मैत्री होती. भ्रमणध्वनीवर दोघेही एकमेकांच्या संपर्कात राहायचे. ही माहिती तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचली. वडिलांनी तिचे घराबाहेर निघणे बंद केले. तसेच तिच्याकडून भ्रमणध्वनीही हिसकावला. त्यामुळे मित्र गौरव चिडला. भेट नाही, संवाद नाही त्यामुळे गौरवसमोर प्रश्न निर्माण झाला. तो तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रयत्न करीत होता. त्याने तिच्या मैत्रिणीची मदत घेतली. तिच्या कडून मातिही घेण्याचा प्रयत्न केला. तिला घरी ठेवले असून भ्रमणध्वनीही हिसकावला. ही माहिती गौरवला मिळताच तो बुधवारी रात्री मैत्रिणीच्या घरी गेला. त्याने तिच्या वडीलाची भेट घेवून लग्नाची मागणी घातली. या प्रकारामुळे तिचे वडिल संतापले. ‘तू घराबाहेर निघ... असे बजावले. मात्र, तो घराबाहेर निघायला तयार नव्हता. तिच्या वडीलाने धक्के देऊन त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने पाठीमागे लपविलेला चाकू काढला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. लग्नास नकार आणि अपमानित झालेल्या गौरवने तिच्या वडिलावर चाकूने हल्ला केला. बळजबरीने घराबाहेर काढल्यानंतर त्याने दरवाज्याला लाथा मारल्या आणि दरवाजा दगडाने फोडण्याचा प्रयत्न केला. शेजा-यांनी धाव घेतल्यानंतर गौरव पळून गेला. या प्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल केला.