किसान सभेचे तळेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० जानेवारी २०२१

किसान सभेचे तळेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू

किसान सभेचे तळेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू

जुन्नर / आनंद कांबळे

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागतील तळेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गचाळ कारभारामुळे स्थानिक कष्टकरी,आदिवासी बांधवांचे प्राण गेलेले आहेत व पुढे ही जात राहतील,रुग्णांवर नीट उपचार न झाल्याने त्यांना अनेक वेळा खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावे लागतात त्यामुळे कर्जाचा डोंगर अजून वाढत जातो....

दि.19-1-2021 रोजी तळेघर येथे रात्री साडे दहा वाजता एक सिरीयस रुग्ण आणला गेला पण डॉक्टर उपस्थित नव्हते.

नुकतेच फलोदे गावातील एका गरोदर मातेस व बाळाला ही येथे आणले होते पण डॉक्टर उपलब्ध नव्हते वेळेत उपचार न मिळाल्याने सदरील महिला व बाळ मरण पावले....

या आगोदर ही श्रीमती लोहकरे यांना ही वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांना ही प्राण गमवावे लागले.....

सर्पदंश झालेले रुग्ण येऊनही त्यांच्यावर उपचार न करणारे,opd ला सकाळी 9 ची वेळ असून 11 वाजता येणारे
डॉ बिरारी यांची असंवेदशिलता अजून किती जणांची बळी घेणार हा येणार काळ ठरवेल...

या सर्व पार्श्वभूमीवर किसान सभेने
दि.31-12-2020 रोजी आंदोलन पुकारले होते,परंतु
तालुका आरोग्य अधिकारी व सहाययक गट विकास अधिकरी यांनी लेखी दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते...

लेखी देऊनही नवीन डॉक्टर उपलब्ध झाले नाही व डॉक्टर निवासी थांबत नाहीत....

संघटनेची म्हणजेच जनतेची केलेली फसवणूक याविरोधात व या भागातील मरणसत्र थांबविण्यासाठी किसान सभेच्या वतीने आज 
दि.20-1-2021 पासून बेमुदत धरणे आंदोलन सूरु केले आहे


 प्रमुख मागण्या 

तळेघर येथे निवासी डॉक्टर असावेत...

तळेघर येथे मूळ नियुक्तीस असलेले डॉ.उभे यांना त्यांच्या मूळ जागी आणावे....
डॉ बिरारी हे दोन मृत्यूस जबाबदार आहेत त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व तोपर्यंत त्यांना निलंबित करावे
डॉ बिरारी यांच्या विविध तक्रारी मांडुन ही त्यांची साधी बदली ही न करणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी.....
तळेघर येथील ग्रामीण रुग्णालय सुरू करावे.
व?वरील मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत धरणेआंदोलन तळेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर सुरू असेल.
या मागण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास संघटना बेमुदत धरणे आंदोलनाचे रूपांतर उपोषणात करेल...
आंबेगाव तालुका किसान सभा समितीचे सदस्य या आंदोलनात अशोक पेकारी
राजू घोडेकृष्णा वडेकरसुभाष भोकटे,
देविका भोकटेरामदास लोहकरे,अशोक जोशीदत्ता गिरंगे नंदा मोरमारे मच्छिंद्र वाघमारे राजू ईष्टे  ज्ञानेश्वर मेमाणे सुनील पेकारी कुंडलिक केंगले अशोक पारधी सामील झाले आहेत.