यंग चांदा ब्रिगेडच्या वार्ड संघटीका कल्पना मानुसमारे यांचे अपघाती निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ जानेवारी २०२१

यंग चांदा ब्रिगेडच्या वार्ड संघटीका कल्पना मानुसमारे यांचे अपघाती निधन

यंग चांदा ब्रिगेडच्या वार्ड संघटीका कल्पना मानुसमारे यांचे अपघाती निधन


यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने श्रध्दांजली


चंद्रपूर : यंग चांदा ब्रिगेडच्या गोपालपूरी वार्ड संघटीका कल्पना मानूसमारे यांचे घर काम करतांना जिन्यावरुन खाली कोसळल्याने दुखःद निधन झाले आहे. त्यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक क्षेत्रात यशस्वी प्रवास सुरु केला होता. मात्र नियतीच्या घातामूळे त्यांचा हा प्रवास संपला आहे.
चार दिवसांपुर्वी स्वताच्या घरी घरकाम करत असतांना घरातील जिण्यावरुन खाली कोसळल्याने त्या गंभिर जखमी झाल्या होत्या. चंद्रपूरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र आज त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या मृत्यूनंतर यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोकसंवेदना व्यक्त करत त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कल्पना मानूसमारे यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगीरी करत अनेक सामाजिक उपक्रम राबविले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना गोपालपूरी वार्ड संघटीका म्हणून नियुक्तीही देण्यात आली होती. त्यांच्या अचानक जाण्याने सामाजिक क्षेत्रात उदयास येत असलेल नाव कायमचे हरपले असल्याची शोकसंवेदना यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष तथा चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे.