नवेगावबांध येथे मा जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ जानेवारी २०२१

नवेगावबांध येथे मा जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी

नवेगावबांध येथे मा जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी

संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.13 जानेवारी:-
येथील प्रभाग क्रमांक १( क्रांती चौक) येथे दिं. १२ जानेवारी रोज मंगळवार ला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सायंकाळी ६.०० वाजे प्रभागात शोभायात्रा काढण्यात आली. राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दिवसभरात विविध उपक्रम राबविण्यात आले. दुपारी सायकल शर्यत, स्वरक्षणाकरीता तायक्वांडो- कराटे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रेखा शहारे ह्या होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून बाबुदानजी खोब्रागडे, जगदीशजी होले, भगत उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये सुनंदा किरसान ह्या जिजाऊच्या व शिवाजी च्या वेशभूषेत बाल श्रेयस या मायलेकरानी नाटीका सादर केली. आजच्या कार्यक्रमाचे दोघेही आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते. कु. स्वीटी खोब्रागडे, मृनाली टेभुणें, सुप्रिया डोंगरे, फरिदा तिरपुडे, लता जिभकाटे यांनी गीत गायन सादर केले.कु. स्नेहल व पायल बन्सोड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनावर पोवाडा गायला. प्रमुख पाहुणे जगदिश होले, शालीनी लांजेवार , शाहीली शहारे, यांनी स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ, शिवाजी महाराज, वैज्ञानिक स्टिफन हॉकीन्स यांच्या बद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना बन्सोड यांनी केले.तर उपस्थितांचे आभार अशोक बन्सोड यांनी मानले. कार्यक्रमाला प्रभागातील महिला-पुरुष पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.