नासुप्र येथे 'राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद' जयंती साजरी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ जानेवारी २०२१

नासुप्र येथे 'राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद' जयंती साजरीनासुप्र येथे 'राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद' जयंती साजरी

नागपूर, १२ जानेवारी २०२१: ‪महाराष्ट्राचे आराध्य वीरमाता, राजमाता जिजाऊ आणि बलशाली भारताचे स्वप्न साकार करणारे,‬ तरुणांचे स्फूर्तिस्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती आज मंगळवार, दिनांक १२ जानेवारी रोजी सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात साजरी करण्यात आली. नामप्राविप्रा'चे अपर आयुक्त श्री. हेमंत पवार आणि नासुप्र'चे महाव्यवस्थापक व नामप्रविप्रा'च्या नगर रचना विभागाचे उप-संचालक श्री. राजेंद्र लांडे यांच्याहस्ते 'राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद' यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी नासुप्र व नामप्रविप्रा'चे इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.