पक्षाने एकही जागा लढवली नाही; तरीही चंद्रपूरचा कार्यकर्ता पक्षासाठी काम करतोय @Jayant_R_Patil - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२९ जानेवारी २०२१

पक्षाने एकही जागा लढवली नाही; तरीही चंद्रपूरचा कार्यकर्ता पक्षासाठी काम करतोय @Jayant_R_Patilचंद्रपूर- निवडणुकीत आघाडी असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाने एकही जागा लढवली नाही. त्यामुळे अनेक जण पक्ष सोडून गेले. मात्र आजही पक्षाचा सच्चा कार्यकर्ता राजुरा येथे पक्षासाठी काम करतोय. मी त्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून कौतुक करतो, असे उद्गार @Jayant_R_Patil  यांनी काढले.


#राष्ट्रवादीपरिवारसंवाद यात्रेच्या आज दुसऱ्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील कार्यकर्त्यांशी प्रदेशाध्यक्ष ना. यांनी संवाद साधला.

पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांना योग्य दिशा द्या, बुथ कमिटी मजबूत करा व जनसंपर्क वाढवा. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर संघर्ष करा, संघर्षाशिवाय गत्यंतर नाही! या संघर्षातून तुम्ही मार्ग काढला तर उद्याचा सूर्य राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, असा संदेश त्यांनी युवा कार्यकर्त्यांना दिला. यावेळी चंद्रपूरचे जिल्हाअध्यक्ष राजेंद्र वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.


'राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा - संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूशी!' या उपक्रमांतर्गत प्रदेशाध्यक्ष ना. हे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास सज्ज आहेत.