चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाला आरोग्य कवच - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२९ जानेवारी २०२१

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाला आरोग्य कवच

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाला आरोग्य कवच


सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार : महापौर यांच्या हस्ते लोकार्पण

चंद्रपूर : श्री माता कन्यका सेवा संस्था च्या वतीने आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाला कोरोना संकट काळात आरोग्य कवच ठरलेले sanitiser मशीन भेट देण्यात आली. गुरुवारी या मशीन चे उद्घाटन महापौर राखी कंचर्लावार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पत्रकार मझहर अली, रमेश कलेपेल्ली, जितेंद्र मशारकर, प्रशांत देवतळे, अमित वेलेकर, अनिल ठाकरे, निलेश डाहाट , गणेश अडलुर उपस्थित होते. श्रमिक पत्रकार संघाचे सदस्य, माध्यम सहकारी, पत्रकार संघात येणाऱ्या नागरिकांसाठी ही मशीन आरोग्य कवच ठरेल असे मत महापौर राखी कंचर्लावार यांनी व्यक्त केले. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम आणि सचिव प्रशांत विघ्नेश्वर यांनी आमदार मुनगंटीवार यांच्याकडे अशी स्वयंचलित मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत मुनगंटीवार यांनी तत्काळ पत्रकार संघासाठी आरोग्य कवच उपलब्ध करून दिले आहे.