आज शीतलचा वाढदिवस; निधनानंतर प्रथमच ङाॅ. विकास आमटे यांनी केलं भावनिक ट्विट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत



२६ जानेवारी २०२१

आज शीतलचा वाढदिवस; निधनानंतर प्रथमच ङाॅ. विकास आमटे यांनी केलं भावनिक ट्विट



 वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ, ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांच्या कन्या डॉक्टर शीतल आमटे – करजगी यांचे 30 नोव्हेंबर 2020 रोजी निधन झाले.  

26 जानेवारी 1981 रोजी जन्मलेल्या शीतल आमटे आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. त्या मानसिक तणावात असताना 30 नोव्हेंबर रोजी त्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त पुढे आले. 
डॉक्टर शीतल यांचा आज 26 जानेवारी रोजी वाढदिवस असून यानिमित्त डॉक्टर विकास आमटे यांनी एक भावनिक ट्विट केलेले आहे. "प्रत्येक दिवस तुझ्या आठवणीत जातो" असे या ट्विटमध्ये लिहत शितलच्या वडिलांनी निधनानंतर प्रथमच भावना व्यक्त केल्या आहेत. 


आज शीतलचा वाढदिवस. आज तु हवी होतीस शीतल. असा एकही दिवस जात नाही, जेव्हा तुझी आठवण येत नाही. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂 😞
#HappyBirthdaySheetal
#happybirthday