नागपूर जिल्ह्यात ग्राम पंचायत निवडणुकीत मनसेने खाते उघडले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२० जानेवारी २०२१

नागपूर जिल्ह्यात ग्राम पंचायत निवडणुकीत मनसेने खाते उघडलेरामटेक तालुक्यातील पथरी (अंबाझरी) गट ग्रामपंचायत मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना समर्थीत नवनिर्माण ग्रामविकास पॅनेल च्या कुंदन राऊत, संदीप वासनिक व संगीता कुमरे यांनी चांगल्या मतांनी विजय प्राप्त केला ,या विजयानंतर त्यांनी मनसे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांची भेट घेतली असता त्यांनी पुष्पगुच्छ व मिठाई देऊन विजयी उमेदवारांचे स्वागत केलेव गावाच्या विकासासाठी शुभेच्छा दिल्या या तिन्ही उमेदवारांच्या विजयासाठी मनसेच्या आदित्य दुरुगकर, शेखर तुंडे,मुरली बघमारे,रोशन राऊत, मनोज पालिवाल, विश्वनाथ बेहते यांनी विशेष परिश्रम घेतले.


ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल मनसे साठी सुध्दा दिलासा देणारा ठरला असून रामटेक तालुक्यातील गट ग्रामपंचायत पथराई (अंबाझरी) येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना समर्थित नवनिर्माण ग्रामविकास पॅनेलचे उमेदवार सर्वश्री कुंदन राऊत, संदीप वासनिक, सौ. संगीता बलदेव कुमरे यांचा बहुमताने विजय झाला. विजयाचा निकाल हाती येताच पथराई गावात उत्साहाचे वातावरण तयार झाले. गुलाल उधळत मनसैनिक आणि ग्रामस्थांनी विजयी उमेदवारांचे स्वागत केले. विजयी उमेदवारांनी सर्व ग्रामस्थ आणि त्यांच्या विजयासाठी सातत्याने पाठीशी उभे असलेले मनसेचे निवडणुक पर्यवेक्षक आदित्य दुरुगकर यांना श्रेय दिले.
मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे, प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांचे आभार मानले.
निवडणुकीच्या प्रचारात काम करणारे मुरली बघमारे , सुनील राऊत , माजी उपसरपंच रोशन राऊत, विश्वनाथ सरवरे, रामटेक तालुका पदाधिकारी शेखर धुंडे, मनोज पालीवाल, दुर्गेश साकुलकर व सहकारी यांचेसुद्धा विजयी उमेदवारांने आभार मानले.