शासकीय नोकरभरती घेण्यात यावी, कंत्राटी नोकरभरती बंद करून बेरोजगारांवर होणार अन्याय बंद करा - कादर शेख - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२४ जानेवारी २०२१

शासकीय नोकरभरती घेण्यात यावी, कंत्राटी नोकरभरती बंद करून बेरोजगारांवर होणार अन्याय बंद करा - कादर शेख

शासकीय नोकरभरती घेण्यात यावी, कंत्राटी नोकरभरती बंद करून बेरोजगारांवर होणार अन्याय बंद करा - कादर शेख
चंद्रपूर - मागील काही वर्षापासून रखडलेली पोलीस भरती, इतर शासकीय नोकर भरती त्वरित घेण्यात यावी.
तत्कालीन सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने नोकर भरती बंद केली होती काही भागातच नोकरभरती केली जात होती तर नोकऱ्यांची कंत्राटीकरण करून कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करून सुशिक्षित बेरोजगार युवक वर अन्याय केला. त्यातच काही वर्षा पूर्वी भाजप नेत्यांनी विद्यार्थ्यांना पकोडे विकण्याच्या सल्ला देत त्यांच्या नोकर्‍याच्या आशेवर पाणी फेरले, त्यामुळे भाजप सरकारच्या विरोधात राज्याचे नव्हे तर देशभरातील युवकांमध्ये संतापाची लाट आहे.
मागील काही वर्षापासून शासनाने कुठल्याही प्रकारची इतर शासकीय नोकर भरती पोलीस भरती घेतलेली नाही फक्त मेगा भरती च्या नावाखाली तत्कालीन सरकारने फडणवीस सरकारने आम्ही 72 हजार शासकीय जागा भरून असे खोटे व दिशाभूल करणारे आश्वासन दिले. तथापि तत्कालीन सरकारने काही विभागातील नोकरभरती घेण्यास सुरुवात केली तरी पण त्या महापोर्टल व महापरीक्षेद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये अनेक प्रकारची त्रुटी अडचणी व्यवस्थापन व गैरकारभार याबाबतच्या तक्रारी आढळून आल्या याबाबतच बेरोजगार युवकांनी बऱ्याच वर्षापासून तत्कालीन सरकारला फडणवीस सरकारला असंख्य तक्रारी केल्या परंतु तत्कालीन सरकारने या यंत्रणेवर कुठल्याही प्रकारची कडक कारवाई करून त्वरित नोकर भरती घेतली नाही. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव मोहम्मद कादर शेख आणि लाखो बेरोजगार युवक युवतींची ह्रदयपूर्वक विनंती आहे. की,आपल्या राज्यामध्ये लाखो युवक युवती बेरोजगार असून ग्रामीण भागातील गरीब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आलेले असून त्यांना प्रशासकीय सेवांमध्ये संधी देण्यात यावी. मागील पाच वर्षापासून रखडलेली पोलीस भरती इतर शासकीय भरती घेण्यात यावी. रिक्त पदांची भरती घेण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव युवा नेता मोहम्मद कादर शेख यांनी इतर शासकीय नोकर भरतीची तयारी करणारे सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी मा. नामदार अनिल देशमुख साहेब गृहराज्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करूण मागील काही वर्षापासून रखडलेली पोलीस भरती, इतर शासकीय नोकर भरती त्वरित घेण्यात यावी अशी मागणी केली.