खाजगी शिक्षक शिक्षकेतरांना GIS योजना लागू करा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२९ जानेवारी २०२१

खाजगी शिक्षक शिक्षकेतरांना GIS योजना लागू करा

 खाजगी शिक्षक शिक्षकेतरांना GIS योजना लागू करा📌 विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाची मागणी


नागपूर - राज्यातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना GIS समूह विमा योजना लागू करावी, अशी मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक) नागपूर विभाग नागपूर तर्फे शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे सरांच्या नेतृत्वात करण्यात आली. या संदर्भातील निवेदन वित्त सचिव, शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त यांना शिक्षण उपसंचालक यांच्या मार्फत पाठविण्यात आले.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारतर्फे GIS समूह विमा योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास मदत, गृहबांधणीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करण्यात येते. मात्र कर्मचाऱ्यांच्या हितार्थ असलेल्या या योजनेतून केवळ खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. हा राज्य सरकारी कर्मचारी व खाजगी अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करीत आहे. खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी GIS समूह विमा योजना लागू करावी, Covid-19 च्या कारणास्तव वर्षभरापासून थकीत वेतन देयके, निवृत्त वेतन देयके व वैद्यकीय देयके तातडीने मंजूर करण्यात यावी, वेतन पथक कार्यालयात तातडीने वैद्यकीय देयके स्विकारण्यात यावे अशी मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी शिक्षण उपसंचालक डॉ वैशाली जामदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे, विभागीय सचिव खिमेश बढिये, माध्यमिक संघटक श्री राजू हारगुडे, उच्च माध्यमिक संघटक श्री कमलेश सहारे, जिल्हा संघटक राजेंद्र खंडाईत यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते