जीआयए आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या वेतन आयोगानुसार वेतनाच्या मागण्या मंजूर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२१ जानेवारी २०२१

जीआयए आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या वेतन आयोगानुसार वेतनाच्या मागण्या मंजूर

जीआयए आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या वेतन आयोगानुसार वेतनाच्या मागण्या मंजूर 


चंद्रपूर : जीआयए आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या वेतन आयोगानुसार वेतनाच्या मागण्या मंजूर केल्याबद्दल तसेच covid-19 मध्ये काम केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर परिश्रमिक अदा केल्याबद्दल माननीय आमदार श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार व माननीय महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांचे मनःपूर्वक आभार.
दिनांक १९/०१/२०२१ ला झालेल्या सर्वसाधारण सभेत कुटुंबकल्याण माता-बाल संगोपन व शालेय आरोग्य योजनेतील नऊ कर्मचारी यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर यांनी मनपा अधिकारी व कर्मचारी प्रमाणे चौथा वेतन आयोग, पाचव्या वेतन आयोग तसेच सहावा वेतन आयोगानुसार वेतन लागू करण्याबाबत याचिका दाखल केली होती. सदर याचिकेवर माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी दिलेल्या निर्वाळ्यात सदर कर्मचारी हे महानगरपालिकेचे असल्याने यांना पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आयोगाचे लाभ देण्यात यावा, असे नमूद केले होते. माननीय उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय युक्त कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावा असे नमूद केले होते माननीय उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय उक्त कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत विषय सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला असता माननीय महापौर सौ राखी संजय कंचर्लावार यांनी जीआयए योजनेतील इतर कर्मचारी प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या वेतन आयोगानुसार वेतन मागणीकरिता प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात गेले नाही त्यांनाही ४ था ,५ वा व ६ व वेतन आयोगाचा तसेच मनपाच्या आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचारी यांच्या प्रमाणे वेळोवेळी मिळणाऱ्या वेतन आयोगानुसार वेतनाचा लाभ देण्यात यावा, याबाबतचा ठराव पारित केलेला आहे. सदर कार्यासाठी माननीय आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभलेले आहे. याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी मानले.
तसेच covid-19 या विषाणूच्या उद्रेकाच्या काळात सदर साथ नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने रुग्णावर उपचार करण्या करिता आरोग्य विभागातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनी जिवाची पर्वा न करता तसेच त्यांना स्वतःला सदर रोगाची लागण होईल याची कुठलीही भीती न बाळगता अहोरात्र माहे एप्रिल २०२० पासून ते माहे डिसेंबर २०२० पर्यंतच्या 9 महिन्याच्या कालावधीत सर्व शनिवार रविवार तसेच इतर शासकीय सुट्ट्यांचा दिवसात उत्तम व अविरतपणे काम केलेले असल्याने त्यांना 91 दिवसाच्या पारिश्रमिक अदा करण्यास मंजुरी दिल्याबद्दल माननीय आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार, मा. उपमहापौर श्री राहुल पावडे, श्री श्री वसंत देशमुख, सभागृहनेता सर्व गटनेते व सभापती सर्व सन्माननीय नगरसेवक नगरसेविका तथा मनपा प्रशासनाचे आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आभार व्यक्त करण्यात आले .