विद्यार्थ्यांनी सुरक्षिततेला महत्त्व द्यावे - मोटे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ जानेवारी २०२१

विद्यार्थ्यांनी सुरक्षिततेला महत्त्व द्यावे - मोटे

मनसर- विद्यार्थ्यांनी सुरक्षिततेला महत्त्व देत सुखकर प्रवास करावा. अपघात मुक्त प्रवासासाठी नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन मोटे यांनी केले.
येथील प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन येथे रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मिलिंद वानखेडे तर प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन मोटे, दीपक कांकेडवार, सुजीत बैरागी, सचिन शर्मा ग्राम पंचायत सदस्य रवि कठौते, राष्ट्रपाल खोब्रागडे उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांशी वाहतूक नियम, कायदे, नियंत्रण इत्यादी विषयांवर मनसोक्त चर्चा करुन प्रश्नोत्तराच्या माध्यमातून वाहतूक नियमांची माहिती दिली. प्रत्येक नागरिकाने अपघात मुक्त राज्य घडविण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन प्राचार्य मिलिंद वानखेडे यांनी केले.
कार्यक्रमा चे सुञसंचालन श्याम गासमवार आभार ज्योत्सना मेश्राम, विजय लांडे, प्रशांत सरपाते, कामिनी पाटील ,सुचिता बिरोले, मिलिंद वाघमारे, प्रभाकर खंडाते, ठकराले उपस्थित होते