ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करा: मनसेची मागणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२८ जानेवारी २०२१

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करा: मनसेची मागणी

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करा: मनसेची मागणी


२६ जानेवारी २०२१.
नागपूर : कोरोना काळात लोक घरात बंदिस्त असतांना तिप्पट वीज बिल पाठविले व नंतर वीजबिलात दिलासा देण्याचा शब्द दिला.मात्र निव्वळ वेळकाढूपणा करीत ऊर्जामंत्री आणि संबंधित अधिकारी यांनी दिलेला शब्द फिरविला व महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली असा आरोप मनसेने केला.यामुळे संतप्त मनसैनिक यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासह महावितरण कंपनीचे प्रमुख अधिकारी यांच्या विरोधात फसवणूक व मानसिक आघात पोहोचविण्याचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी मनसे नागपूर तर्फे सर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
वाढीव वीज बिलामुळे संतप्त झालेल्या नागरिकांच्या भावना समजून महाराष्ट्र नवनिर्माण सेनाद्वारे जनआक्रोश आंदोलने उभारली गेली व सरकारचे लक्ष वेधून सामान्य जनतेला दिलासा मिळावा करिता पाठपुरावा केला.
पक्षाचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांनी सुध्दा २९ ऑगस्ट २०२० रोजी राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन अवाजवी बिलांबाबत सविस्तर चर्चा केली होती.
मनसे नेते आणि शिष्टमंडळाने वेळोवेळी ऊर्जा मंत्री, ऊर्जा सचिव, महावितरणचे अधिकारी यांच्याशी भेट घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा ही मागणी केली. सातत्याने ऊर्जा मंत्री यांनी खोटे आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली. कोरोना काळातील वाढीव वीजबिलात सवलत देऊन दिवाळीची गोड भेट देण्याचे संकेत राज्यातील जनतेला प्रसार माध्यमांद्वारे ऊर्जामंत्री श्री नितिन राऊत यांनी दिले होते मात्र काही दिवसातच त्यांनी घुमजाव करीत वीज ग्राहकांना कोणतीही सवलत मिळणार नसून वीजबिल भरावेच लागेल असे राज्यातील नागरिकांचा विश्वासघात आणि फसवणूक करणारे वक्तव्य केले. आता २० जानेवारी २०२१ ला ग्राहकांना वीजबिलात सवलत देण्यास महावितरणने नकार दिला आणि थकीत वीजबिल असणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले. यामुळे जनता भयभीत झाली असून नागरिकांना प्रचंड मानसिक आघात व क्लेश पोहोचला आहे असे मनसेने आपल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे.
नागपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले सीताबर्डी पोलिस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक श्री अतुल सबनीस यांना तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेचे राज्य सरचिटणीस श्री हेमंत गडकरी, शहर अध्यक्ष अजय ढोके व विशाल बडगे, जिल्हा अध्यक्ष किशोर सरायकर व सतीश कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी मनविसेचे विदर्भ प्रभारी आदित्य दुरुगकर, महिला सेना शहर अध्यक्ष संगीता सोनटक्के, शहर सचिव घनश्याम निखाडे,विभाग अध्यक्ष चंदू लांडे, उमेश बोरकर, उमेश उत्तखेडे, विभाग सचिव महेश माने, राहुल अलोने,पराग विरखरे, प्रकाश ढोके,तुषार गिरे, सागर नान्हे, लोकेश कामडी,वामन इंगोले व इतर मनसे पदाधिकारी उपस्थित होते.