#Election #News : काँग्रेसने फोडला सावली नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२६ जानेवारी २०२१

#Election #News : काँग्रेसने फोडला सावली नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ


जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सावली नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्ता मेळावा घेऊन कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. सावली नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा विजय होईल. जन हिताच्या कामांचे व विकास कार्याचे धोरण काँग्रेस पक्ष राबवत आहे, असेही हे यावेळी म्हणाले.


  नगरपरिषदेचा व नगरपंचायतीचा नोव्हेंबर व डिसेंबर २०२० मध्ये मुदत संपुष्टात येणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर नगरपरिषद ,सावली नगरपंचायत ,पोभूर्ण नगरपंचायत / नगरपरिषदचे प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील दोन नगरपंचायत व एका नगरपरिषद निवडणुकीचे पडघम वाजणार असून, फेब्रुवारीत  निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. या तिन्ही ठिकाणी १ नोव्हेंबर२०१५ रोजी निवडणूक पार पडली होती. त्यानुसार त्यांचा कालावधी संपुष्टात आला असून, निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केल्यानें राजकिय मोर्चे बांधणीला वेग आला आहे.