बामणी - राजुरा - लक्कडकोट आणि राजुरा - गडचांदूर - कोरपना - आदिलाबाद चौपदरी रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२३ जानेवारी २०२१

बामणी - राजुरा - लक्कडकोट आणि राजुरा - गडचांदूर - कोरपना - आदिलाबाद चौपदरी रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी

बामणी - राजुरा - लक्कडकोट आणि राजुरा - गडचांदूर - कोरपना - आदिलाबाद चौपदरी रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणीचा


केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना माजी आमदार सुदर्शन निमकरांनी दिले निवेदन

राजुरा - राजुरा विधानसभा क्षेत्रातून जाणाऱ्या बामणी-राजुरा-लक्कडकोट व राजुरा-गडचांदूर-कोरपना-आदिलाबाद राज्य सिमा हे दोन चौपदरी रस्ते मंजूर होऊन बरेच वर्ष झाले परंतू अजूनही त्या कामांची सुरूवात किंवा रस्त्यांकरीती भुअर्जनाचे काम रखडलेले आहे. या दोन्ही रस्त्यांचे काम त्वरीत सुरू करण्याची मागणी राजुरा चे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितिनजी गडकरी यांना चंद्रपूर दौऱ्या दरम्यान निवेदन देऊन केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्याअंतर्गत तेलंगाणा राज्यातून राजुरा विधानभा क्षेत्रातून जाणारे आदिलाबाद-कोरपना-गडचांदूर-राजुरा-बामणी-कोठारी-गोंडपिपरी-आष्टी (गडचिरोली जिल्हा) हा राष्ट्रीय महामार्ग क्र. 353-बी या महामार्गाचे काम बामणी ते आष्टी जवळपास पूर्णत्वास आलेले आहे. परंतू अलिकडील आदिलाबाद ते गडचांदूर-राजुरा-बामणी पर्यंतचे काम अजूनही सुरू करण्यात आलेले नसून मार्गाच्या भुअर्जनाचे काम सुद्धा रखडलेले आहे. तसेच चंद्रपूर-बल्लारशा-राजुरा-लक्कडकोट ते तेलंगाना राज्यसिमेपर्यंत असलेला चारपदरी महामार्ग क्र. 930-डी या महामार्गाचे बामणी - लक्कडकोट ते राज्यसिमेपर्यंत च्या कामालाही सुरूवात झालेली नाही. याही मार्गाचे भुअर्जनाचे काम रखडलेले आहे. हे दोन्ही रस्ते अत्यंत महत्वाचे व आंतरराज्य वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणारे आहेत. या मार्गावरूण मोठ्या प्रमाणात प्रवासी व माल वाहतुक होत असते. त्यामुळे या रस्त्यांची सध्या स्थितीत दयनावस्था झाली असून नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांच्या दयनावस्थेमुळे या मार्गावर अनेक अपघात होऊन नागरीकांना जिव सुद्धा गमवावा लागत आहे. या दोन्ही रस्त्यांच्या बांधकामाकरीता शेतकऱ्यांकडून भुअर्जनासाठी सुद्धा कुठलीही अडचण नसतांनाही बऱ्याच
शनी वर्षापासून काम रखडलेले आहे.
या महत्वपूर्ण अशा दोन्ही रस्त्यांची कामे त्वरीत सुरू करण्याची मागणी राजुरा चे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी माजी मंत्री आमदार सुधिर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री ना. नितिन गडकरी यांनी त्यांच्या चंद्रपूर दौऱ्या दरम्यान निवेनद देऊन केली आहे. याप्रसंगी भाजपाचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकुडे, जिल्हा भाजपा चे सचिव हरीदास झाडे सह कार्यकर्ते उपस्थित होते.