विदर्भात आणली शैक्षणिक ज्ञानगंगा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ जानेवारी २०२१

विदर्भात आणली शैक्षणिक ज्ञानगंगा

ओळख कर्तृत्वाची - 6


कर्मवीर मा.सा.उपाख्य दादासाहेब कन्नमवार
!! 6 !!
दादासाहेब कन्नमवार जरी कमी शिकलेले असले तरी त्यांना शिक्षणाचे महत्व पटले होते, आजच्या काळात शिक्षण आवश्यक आहे.याची त्यांना खात्री होती.

वर्धा जिल्यात ते कार्य करीत असतांना त्यांना तिकडील आदिवासी लोकांच्या शिक्षणाची अडचण लक्षात आली.1958 मध्ये त्यांनी "ग्रामविकास"* नावाची संस्था स्थापन केली.या संस्थेमार्फत प्रथम त्यान्नी *आर्वी तहसील (वर्धा जिल्हा) मधील "जऊरवाडा" या गावी शाळा सुरू केली. नंतर वसतीगृह बांधण्यात आले.

शहरी भागात मुलींच्या शिक्षणाची सोय असली तरी ग्रामिण भागातील मुली शिक्षणापासून वंचितच आहेत याची जाणीव होऊन त्यांनी ग्रामीण भागातील मुलींकरीता *" मुलींचे जिजाबाई वसतीगृह "* नागपूर येथे काटोल मार्गावर स्थापन केले. त्याच परिसरात 1963 मध्ये *" तिडके विध्यालय"* सुरू केले.या विध्यालयाला "तिडके" यांचे नाव देण्याचे मुख्य प्रयोजन नागपुरातील भूगोलाचे अध्यापक शिवराम रामचंद्र तिडके यांनी 75,000 रुपयाची उदार देणगी विध्यालयाला दिली.

दादासाहेबांनी नागपूर-अमरावती मार्गावर कारंजा (घाटगे) येथे 1963 पासून खास मुलींकरीता " कस्तुरबा विध्यालय" नावाची पूर्व माध्यमिक शाळा उघडली. पुढे त्याचे माध्यमिक विध्यालयात रूपांतरन झाले. तसेच गडचिरोली येथे साडेतीन लाख खर्च करून शासकीय हायस्कूलची इमारत बांधली.

एकंदरीत कन्नमवार यांनी काही ठिकाणी स्वतःच्या शाळा काढुन तर काही ठिकाणी इतर शैक्षणिक संस्थांना प्रेरणा तसेच आर्थिक सहकार्य करून शैक्षणिक क्षेत्रातही फार मोठी कामगिरी बजावली.


खिमेश बढिये
(नागपूर)
प्रचारक
*दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समिती नागपूर*
8888422662, 9423640394